Robbery crime sakal media
मुंबई

अंबरनाथ : लग्नासाठी पैसे जमविण्यासाठी दानपेट्या फोडणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

अंबरनाथ : मंदिरातील दानपेट्यांसह शिवगंगानगर परिसरातील सहा घरफोड्या (Robbery crime) करणाऱ्या एका अट्टल चोरासह (two culprit arrested) त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अंबरनाथ पोलिसांनी (Ambarnath Police) ताब्यात घेतले. या दोघांकडून दागिने, दोन दुचाकीसह सुमारे पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या अट्टल गुन्हेगारांविरोधात पुणे आयुक्तालय, तसेच हिललाईन पोलिस ठाण्यामध्ये (hilline police station) अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. लग्नासाठी पैसे जमविण्यासाठी घरफोड्या करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

शहरातील दोन मंदिरांमध्ये दानपेटीची चोरी झाली होती. मात्र या घटनांचे सीसी टीव्ही फुटेज नसतानाही पोलिसांनी अंबरनाथमध्ये मामाकडे राहणारा तन्वर सिंग टाक या संशयित गुन्हेगाराला ताब्यात घेतले होते. त्याने शिवगंगानगर परिसरात एकाच रात्रीत सहा घरफोड्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी खाक्या दाखवताच दोन मंदिरातील दानपेट्यांच्या चोरीबाबतही कबुली दिली. आरोपीवर पुणे आयुक्तालयात एकूण २८ गुन्हे दाखल आहेत.

डिसेंबर २०२० मध्ये हिललाईन पोलिस ठाणे हद्दीत आरोपीवर एटीएम मशीन फोडल्याचाही गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी टाक याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, चोरीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे, दानपेटीतील रक्कम आणि दोन दुचाकी असा दोन लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीनची बालसुधारगृहात रवानगी

पुण्याहून आलेल्या टाक यांच्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेत त्याची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात केली आहे; तर टाक याला उल्हासनगर सत्र न्यायालयाने ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT