मुंबई

कोरोनाबाबत अत्यंत महत्त्वाचं विधान, "अँटीबॉडीज म्हणजे कोविड-19 चा इम्युनिटी पासपोर्ट नाही"

भाग्यश्री भुवड

मुंबई, 22 : नोव्हेल कोरोना व्हायरस विषयी आपल्याला अजूनही बऱ्याच गोष्टी संशोधनातून माहिती होत असून  कोविड-19 मधून बऱ्या झालेल्या व्यक्तींना या विषाणूचा पुनःसंसर्ग होण्याची शंका सर्वांच्या मनात आहे. संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरात तयार झालेली प्रतिपिंडे म्हणजे अँटीबॉडीज त्या व्यक्तीला संरक्षण पुरवू शकतात का आणि पुरवत असतीलच तर त्या किती काळापर्यंत प्रभावी राहतात, अशा अँटीबॉडीज पुनर्संसर्गाशी सामना करण्याइतक्या शक्तिशाली असतात का, या विषयावर अजूनही खूप संशोधन होण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. 

अँटीबॉडीजना गृहित धरून चालणार नाही - 

फोर्टिस रुग्णालयाच्या संसर्गजन्य आजार विशेषज्ज्ञ डॉ. अनिता मॅथ्यू यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ)ने सांगितल्याप्रमाणे अँटीबॉडीज हा काही आपला इम्युनिटी पासपोर्ट नाही. अँटीबॉडीजचे आयुर्मान आणि त्याची ताकद यांचा सखोल अभ्यास होण्याची गरज जगभरातील संशोधक सातत्याने मांडत आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडून कोविड-19 वर उपचार घेतलेल्या व्यक्तींमधील पुनःसंसर्गच्या प्रकरणांचा अभ्यास केला जात आहे. मात्र, दरम्यानच्या काळात अँटीबॉडीजना गृहित धरून चालणार नाही. 

नजीकच्या काळात कोविड 19 होऊन गेलेल्या व्यक्तींच्या अधिक गटांचे अधिक विस्तृत निरीक्षण करावे, त्यानंतरच आपण ठोस निष्कर्षापर्यंत पोहचू शकतो, असेही मत मॅथ्यू यांनी व्यक्त केले आहे.

antibodies are not immunity passport for novel corona virus says expert

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Scheme: कामगारांसाठी दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन; काय आहे ही सरकारी योजना? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

केस कटिंग, दाढीचे दर वाढले; महाराष्ट्र नाभिक महामंडळाने जारी केलं नवं दरपत्रक

Social Media Post Safety Tips : सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, एक्स्पर्टनी दिला धोक्याचा इशारा

Monsoon Winds Strengthen : मॉन्सूनच्या वाऱ्याचा वेग वाढला! महाराष्ट्रात दक्षिण कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर चार दिवस मुसळधार

मुलीच्या वादाचं प्रकरण, २२ वर्षीय कॉलेज तरुणाकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी; APIसह हवालदाराला अटक

SCROLL FOR NEXT