मुंबई

130 किलो वजनाचा पर्यटक  "पेब' किल्ल्यावरून घसरला 

सकाळ वृत्तसेवा

130 किलो वजनाचा पर्यटक 
"पेब' किल्ल्यावरून घसरला 
"सह्याद्री रेस्क्‍यू'च्या प्रयत्नांमुळे बचावला 
नेरळ (बातमीदार) : पेब (विकटगड) किल्ल्यावर भटकंतीसाठी पुण्यातून आलेला 130 किलो वजनाचा तरुण मंगळवारी पाय घसरून पडला होता. "सह्याद्री रेस्क्‍यू'च्या पथकाने जीव धोक्‍यात घालून अत्यंत थरारक पद्धतीने बचाव कार्य करत त्याला रात्री उशिरा सुखरूप दरीतून बाहेर काढून जीवदान दिले. 

पुण्यातील आर्यन जेकब जॉर्ज, शुभम शहा, अमीन रेहमान (कोंढवा, पुणे) हे तिघे माथेरान दस्तुरी येथून पेब किल्ल्याच्या दिशेने निघाले होते. किल्ल्लयाच्या जवळील बोरीचा माळ येथे दुपारी आर्यन जॉर्ज या 21 वर्षीय आणि 130 किलो वजनाच्या तरुणाचा पाय घसरला. तो सुमारे 350 फूट दरीत कोसळला. या घटनेनंतर त्याच्या मित्रांनी पोलिसांना कळवले. माथेरान आणि नेरळ पोलिसांनी "सह्याद्री रेस्क्‍यू टीम'ला पाचारण केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन टीमचे संदीप कोळी, सुनील कोळी, वैभव नाईक, सुनील ढोले, अमित कोळी, चेतन कळंबे, अक्षय परब, उमेश मोरे हे घटनास्थळी पोहोचले. तब्बल 7 तास बचावकार्य करत रात्री जॉर्जचे प्राण वाचवले. 

अधिक वजनामुळे अडथळा 
पेब किल्ल्यावरील बचावकार्यात जॉर्जचे अधिक वजन, हा मोठा अडथळा होता. परंतु त्यावर मात करत दोराच्या साह्याने टीमने त्याला वर काढले. विशेष म्हणजे जॉर्ज किरकोळ जखमी होता. तेव्हा दस्तुरी येथे आल्यानंतर खासगी वाहनाने त्याला नेरळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

 जखमी जॉर्ज.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT