मुंबई

मुंबईकरांच्या विकास प्रकल्पापेक्षा विलासी राजपुत्राचा अहंकार मोठा; भाजप आमदाराची जहरी टीका

तुषार सोनवणे

मुंबई - कांजूरमार्गवरील मेट्रोचे कारशेडचं काम थांबवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे या मेट्रो कारशेडची जागा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीमध्ये स्थानांतरीत करण्याची चाचपणी ठाकरे सरकारने सुरू केली आहे.  यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा आमने-सामने आले आहे. ठाकरे सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.  मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे.  शेलार यांनी ट्वीट करून मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

ट्वीटमध्ये शेलार म्हणतात की. 'मेट्रोला गिरगावात विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढंच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर, प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच करण्यात आला, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. आता मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये, असा डाव महाविकास आघाडी सरकारकडून आखला जात  आहे. मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला जात आहे. हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधकच आहेत, अशी घणाघाती टीकाही शेलारांनी केली आहे.

Ashish Shelars venomous criticism of Uddhav Thackeray and Aditya Thackeray

-------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT