BJP sakal
मुंबई

'भाजपला जनतेच्या विकासाशी काहीही देणघेण नाही'

भाजप नगरसेवकांनीच २०११ मध्ये मैदानासाठी टिपू सुलतान या नावाचा प्रस्ताव दिला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खंडाजंगी सुरु आहे. दरम्यान मुंबई महापालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेला भाजपा अनेक कारणांवरून धारेवर धरतं असतात. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला राणी लक्ष्मीबाई यांच नाव देण्यात यावं अशी मागणी शिवसेनेनं केली. दरम्यान याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधत एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही भाजपाला टोला लगावला आहे.

दरम्यान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजप नगरसेवकांनीच २०११ मध्ये त्या मैदानासाठी टिपू सुलतान या नावाचा प्रस्ताव दिला असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक या संदर्भात लाचार झाले असुन वारंवार हा विषय काढत आहेत. यांना जनतेच्या विकासाशी काहीही देणघेण नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे.

या मुद्द्यावर भाजपा प्रवक्ते राम कदम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, त्या मैदानाला टीपू सुलतान नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यायला हवे. जर तुम्हाला जमणार नसेल तर आम्ही स्वतः शिवरायांच्या नावाचा बोर्ड तिथे जाऊन लावू. मुख्यमंत्र्यांनी अन् त्यांच्या सरकारने मंत्र्याना मैदानाच्या उद्घाटनापासून रोखावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. हिंदुचा नरसंहार करून मंदिरांना उध्वस्त करणार्‍या आक्रमणकारी टीपू सुलतानचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत खपवून घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT