मुंबई

बहिणीच्या नग्न चित्रीकरणासाठी प्रियकराला मदत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : धाकट्या बहिणीचे नग्न चित्रीकरण करण्यास प्रियकराला मदत करणाऱ्या २५ वर्षीय महिलेला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आरोपी बहिणीच्या प्रियकराविरोधातही गुन्हा दाखल असून, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. 
भायखळा येथे राहणारी तरुणी एका खासगी कंपनीत कामाला आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे रुपेश (नाव बदलले आहे) याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत. तक्रारदार तरुणीचे नवरात्रीत रुपेशच्या पत्नीशी भांडण झाले होते. या घटनेमुळे रुपेशने सूड घेण्याच्या उद्देशाने या तरुणीची बदनामी करण्यासाठी तिचे नग्न छायाचित्र घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने २८ ऑक्‍टोबरला प्रेयसीला (पीडित तरुणीची मोठी बहीण) व्हिडीओ कॉल केला आणि बहिणीचे नग्न छायाचित्र घेण्यासाठी मदत करण्यास सांगितले. तसे न केल्यात तुझ्यासोबत लग्न करणार नाही, असेही त्याने धमकावले. त्यानंतर या महिलेने आपल्या धाकट्या बहिणीचे नग्न चित्रीकरण करण्यासाठी मोरीजवळ मोबाईल ठेवला. असे आक्षेपार्ह चित्रीकरण झाल्याचे समजल्यावर पीडित तरुणीने मोठी बहीण व रुपेश यांच्या विरोधात आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपी बहिणीला अटक केली. न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून, आरोपी रुपेशचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सासऱ्याला पाठवला स्क्रीनशॉट
रुपेशने मोरीजवळ मोबाईल ठेवून ही तरुणी स्नान करत असताना चित्रीकरण करण्यास प्रेयसीला सांगितले. त्यानुसार चित्रीकरण झाल्यावर त्याने व्हिडीओचा स्क्रीनशॉट घेऊन या तरुणीच्या सासऱ्याला पाठवला. त्याने विचारले असता पीडित तरुणीच्या लक्षात सर्व प्रकार आला. तिने तत्काळ मोठ्या बहिणीला भेटून विचारणा केली असता तिने रुपेशला मदत केल्याचे कबूल केले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT