ullhasnagar
ullhasnagar 
मुंबई

उल्हासनगरात 100 कोटींच्या टॅक्स वसुलीच्या टार्गेटसाठी सहाय्यक आयुक्तांचा आधार

दिनेश गोगी

उल्हासनगर - जिन्स व्यवसाय बंदचा फटका, विकास आराखड्याच्या दहशतीचे पडसाद असतानाही मागच्या वर्षी 97 कोटींची मालमत्ता (टॅक्स) कर वसुली करून मागील सर्व उच्चांक मोडीत काढले होते. यावेळेस शंभर कोटींचे लक्ष गाठण्यासाठी किंबहूना ओलांडण्यासाठी उल्हासनगर पालिकेने प्रभाग निहाय नियुक्त्या करण्यात आलेल्या चार सहाय्यक आयुक्तांचा आधार वसुलीसाठी घेतला आहे. ही रणनीती असून त्यामुळे शंभर कोटी मालमत्ता कर वसुलीची शक्यता नाकारता येत नाही.अशी माहिती कर निर्धारक व संकलक संतोष जाधव यांनी दिली.

सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या प्रभागातील माहिती असते.नागरिकांशी त्यांचा नित्याचा संपर्क असतो.मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी वर्षातून एकदाच कर वसुलीसाठी जातात.त्यांच्याकडे मनुष्यबळ नसल्याने त्यांना वसुलीची सक्ती करता येत नाही. त्यामुळे आयुक्त गणेश पाटील,मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांच्या निर्देशान्वये सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, नंदलाल समतानी, भगवान कुमावत यांचा आधार वसुलीसाठी घेण्यात आला आहे. हे चारही अधिकारी त्यांच्या प्रभागात मालमत्ता कर विभागाच्या निरीक्षकां सोबत वसुलीसाठी फिरणार असल्याचे संतोष जाधव यांनी सांगितले.

पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने 2017 मध्ये तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी उत्पन्नाचे एकमेव सोर्स असलेल्या मालमत्ता कर अर्थात टॅक्स वसुलीसाठी अभययोजना लागू केली होती. थकबाकीची फुगवून ठेवलेली आकडेवारी आणि चालू वर्षाची 92 कोटींची वसुली करण्याचे ध्येय अधिकाऱ्यांसमोर होते. त्यासाठी मालमत्ता कर विभागातील उपायुक्त दादा पाटील, करनिर्धार व संकलक संतोष जाधव,उपकर निर्धारक व संकलक जेठा ताराचंद यांच्यासह कर विभाग तसेच पालिकेतील सर्व विभाग प्रमुखांना निंबाळकरांनी वसुलीसाठी जुंपले होते. मार्च 2017 ते मार्च 2018 हा टॅक्स भरण्याचा कालावधी. सुरवातीला प्रतिसाद मिळू लागला. मात्र उल्हासनगरातील विनाशकारी डेव्हलपमेंट प्लॅन वर्ष अखेरीस झळकला. त्यात 120 फुटाच्या रिंगरूट खाली व जिथे पूर्णतः वसाहती आहेत तिथून 80 ते 100 फुटाचे हायवे सारखे रोड काढण्यात येणार असल्यामुळे सुमारे दिडेक लाख नागरिकांच्या घरावर नांगर फिरणार असल्याच्या धाकधूकीने या भागातून टॅक्स चा पैसा आला खरा, पण हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.मात्र 97 कोटींच्या घरात टॅक्स ची वसुली हा रेकॉर्ड प्रस्थापित झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT