मुंबई

चेंबूर मनसे विभागाध्यक्षावर हल्ला 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मनसेचे चेंबूर येथील विभागाध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांच्यावर 11 ते 12 जणांच्या टोळक्‍याने हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी घडला. चेंबूर पूर्व येथील माहुल मार्गाजवळील सिंधी कॉलनीजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. 
शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास दुनबळेंच्या घराजवळ सिंधी सोसायटीत हा प्रकार घडला. वैयक्तिक वादातून टोळक्‍याने दुनबळेंवर लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात दुनबळे यांच्या डोक्‍याला जखमा झाल्या असून त्यांना 22 टाके पडल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्यांच्यावर सुराणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 याप्रकरणी चुनाभट्टी पोलिस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तर दुनबळे यांच्याविरोधातही चेंबूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त लखमी गौतम यांनी दिली. याप्रकरणी सतीश आठवले, गोपाळ नाडर, आसीफ शेख व रवींद्र गायकवाड यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने सर्व आरोपींना 8 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बीपीसीएलमधील कंत्राटाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे; तर दुसरीकडे चेंबूरमधील विनयभंग प्रकरणाचा याच्याशी काही संबंध आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT