file photo 
मुंबई

एमजी मोटर इंडियाद्वारे 'मार्व्हल एक्स'चे अनावरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एमजी मोटर इंडियाने आज ऑटो एक्स्पो २०२० मध्ये जागतिक पातळीच्या उत्पादनांची एक मोठी मालिका सादर करून मोबिलिटीचे भविष्य प्रस्तुत केले. या उत्पादनांच्या श्रेणीत मार्व्हल एक्सचा समावेश आहे, जे तिस-या स्तराचे इंटेलिजंट ड्रायव्हिंग साध्य करण्यासाठी बनवलेले जगातील पहिले मास-प्रॉडक्शन मोडेल आहे. इंटरनेट, इलेक्ट्रिक आणि ऑटोनॉमस क्षमता यांचा समन्वय असलेली अत्याधुनिक उत्पादने विकसित करण्यावर एमजीचा भर असून 'मार्व्हल एक्स' त्याचाच एक भाग आहे.

हे ही महत्‍वाचे...प्रवाशांना एसी लोकल नको. आहे त्‍यातच सुधारणा करण्‍याची मागणी

व्हिजन-आय संकल्पना ‘जगातील पहिली ५जी झीरो-स्क्रीन स्मार्ट कॉकपिट’ म्हटली जाते. ही संकल्पना वाहनाची नवी श्रेणी व्याख्यायित करणारी संकल्पना म्हणून विकसित करण्यात येत आहे, अशी श्रेणी जी ५जी ट्रॅव्हेलिंगच्या दुनियेत सर्वोत्तम असेल. या भविष्यवेधी कन्सेप्ट कारमधील ऑग्मेंटेड रियालिटी मॅप नेव्हिगेशन अधिक अचूक करते आणि दृश्य रूपातही दिसते ज्याद्वारे वाहन स्वतःच पार्किंगची जागा शोधून पार्क होते. तसेच यात एज्युकेशन, लीझर, ड्राइव्हिंग, स्लीपिंग किंवा मीटिंग असे अनेक हॅंड्सफ्री ड्राइव्हिंग मोड आहेत.

ऑटो एक्स्पो २०२० मध्ये या कार उत्पादक कंपनीने हॅचबॅक, सेडान आणि युटीलिटी वेहिकल वर्गातल्या एकूण १४ इंटरनेट, इलेक्ट्रिक आणि ऑटोनॉमस गाड्या प्रदर्शित केल्या आहेत.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले, “कनेक्टेड, टेक-प्रेरित आणि शाश्वत हे मोबिलिटीच्या भविष्याबद्दल एमजीचे व्हिजन आहे. आणि हे व्हिजन साकार करण्याच्या आमच्या कटिबद्धतेचे प्रतीक म्हणजे आम्ही प्रदर्शित केलेली उत्पादने आहेत. भारतीय बाजारपेठेत हेक्टर आणि झेडएस ईव्ही सारखी त्या त्या श्रेणीतील आघाडीची उत्पादने यशस्वीरित्या लॉन्च केल्यानंतर विविध श्रेणींमधील या १४ जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचा उद्देश, भविष्यात काय रोमांच आणि इनोव्हेशन दडलेली आहेत, याची झलक उपभोक्त्यांना व हित धारकांना देणे हा आहे.”

हे ही महत्‍वाचे...काँग्रेस म्‍हणतयं आमच ठरलयं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Farmer Loan Waiver : वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; 10 कोटी 20 लाखांचा लाभ मंजूर

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Marathi News Live Updates : भंडारा येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चा

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

SCROLL FOR NEXT