Tiger
Tiger 
मुंबई

बछड्यांना पकडण्यापूर्वीच नॅशनल पार्कची टीम माघारी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - अवनी वाघिणीच्या शिकारीनंतर आता तिच्या बछड्यांना पकडण्याचे आवाहन वन विभागापुढे आहे. त्यासाठी यवतमाळमधील पांढरकवडा येथे गेलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक आठवडाभरातच रिकाम्या हाताने परतले आहे. अधिवेशनाचे दिवस आणि निवृत्तीच्या टप्प्यात असताना नसते बालंट लागू नये म्हणून अधिकाऱ्यांचे पथक परत आल्याचे समजते. सहा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह शंभरहून अधिक वनाधिकारी अवनीच्या हत्येनंतर तिच्या दोन बछड्यांचा शोध घेत आहेत. 

अवनीच्या शिकारीनंतर बारा दिवसांनी १४ नोव्हेंबर रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये तिचे बछडे दिसले. नर व मादी असे दोन्ही बछडे आईप्रमाणेच आकाराने धष्टपुष्ट असल्याने त्यांना पकडण्यासाठी ब्रह्मपुरी आणि नागपूरमधील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमसह राष्ट्रीय उद्यानाचे पथक गेले होते.

आठवडाभरात पाच ते सहा वेळा बछडे आणि दोन वेळा त्यांच्या पावलाचे ठसे गस्तीवर असलेल्या वनाधिकाऱ्यांना दिसले. अवनीच्या मृत्यूनंतर बछड्यांची भूक भागवण्यासाठी म्हशीचे कापलेले मांस वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले आहे. त्यावर बछड्यांचे खाणे व्यवस्थित सुरू असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहेत. सध्याच्या राहत्या ठिकाणापासून खाण्याच्या जागा बदलत त्यांना वेगळ्या ठिकाणी हलवत पकडण्याची योजना वनाधिकाऱ्यांनी आखली आहे; मात्र त्यासाठी राष्ट्रीय उद्यानाच्या टीमची आवश्‍यकता नाही, अशा सूचना देत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी त्यांना परत पाठवले, असे सांगितले जात आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान बछड्यांना काही झाल्यास चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची भीती टीममधील अधिकाऱ्यांना सुरुवातीपासूनच भेडसावत होती. त्यातच काही अधिकारी जानेवारीमध्ये निवृत्त होणार आहेत. बछडे पकडताना काही कमी-जास्त झाल्यास मानाने निवृत्त होण्याऐवजी चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकून निलंबनाची कारवाई होण्याची भीती असल्याने टीम परत आल्याचे समजते. मात्र संपूर्ण घटनेबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टीम पुन्हा शोध घेणार? 
नॅशनल पार्कसह इतर भागातील टीमही कार्यरत आहे. बछड्यांना पकडण्यासाठी एकाच वेळी सहा विभागांच्या टीम कार्यरत ठेवल्यास नियमित कामावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे, अशी भीती अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव-पूर्व) सुनील लिमये यांनी व्यक्त केली. आळीपाळीने आम्ही वेगवेगळ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीम बोलावणार आहोत. नॅशनल पार्कच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम लवकरच बोलावली जाईल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT