मुंबई

अटक टाळण्यासाठी स्वत:च्याच गळ्यावर वार 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - अटक टाळण्यासाठी एका आरोपीने पोलिसांदेखत स्वतःच्याच गळ्यावर वार केल्याची घटना गुरुवारी मानखुर्द येथे घडली. नरेश जैस्वाल (वय 40) असे त्याचे नाव आहे. त्याने यापूर्वीही अटक टाळण्यासाठी हा प्रकार केला होता. 

मानखुर्दच्या शांतीनगर झोपडपट्टीत राहणारा नरेश दादरच्या भाजी मार्केटमध्ये पहाटे भाजी विकतो. चोरीच्या अनेक घटनांमध्येही त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. 9 ऑक्‍टोबरला नरेश आणि त्याच्या साथीदाराने शिवाजी पार्क परिसरात रविकुमार पांडे नावाच्या व्यक्तीला रस्त्यात गाठून हातचलाखीने त्यांचे सोन्याचे दागिने काढून घेतले. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेजची तपासणी केली. नरेशचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे त्या फुटेजमधून स्पष्ट झाले. त्याला अटक करण्यासाठी पोलिस मानखुर्दला गेले होते. पोलिस पकडून नेत असताना नरेशने त्यांच्या हाताला झटका देत ओट्यावर पडलेला चाकू उचलत स्वत:च्या गळ्यावर वार केले. नंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. 

जखमी व्यक्तींना पोलिस अटक करत नसल्याच्या समजातून नरेशने यापूर्वी अनेकदा असा प्रकार केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT