File Photo
File Photo 
मुंबई

शिक्षकांना पीएफमधून रक्कम देण्यास टाळाटाळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भविष्य निर्वाह निधीतून ना परतावा रक्कम काढण्याच्या प्रस्तावांवर पे युनिट व शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्रुटी काढून टाळाटाळ चालवल्याचा आरोप भाजप शिक्षक आघाडीने केला आहे. याबाबत भाजप शिक्षक आघाडीने गुरुवारी (ता. 21) राज्याच्या लेखा व कोषागारे संचालनालयाकडे तक्रार केली असून, शिक्षक-कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.

भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) मुलीचे लग्न, घरबांधणी आणि अन्य आकस्मिक कारणांसाठी ना परतावा रक्कम काढता येते. सरकारी कर्मचाऱ्यांना ही रक्कम काढण्यासाठी 10 वर्षे सेवेची अट आहे. पीएफबाबतचा नियम सरकारी कर्मचारी व खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी सारखाच आहे.

तथापि, पे युनिटकडून शिक्षक-कर्मचाऱ्यांना 20 वर्षांच्या सेवेची अट घालून प्रस्ताव फेटाळण्यात येत आहेत. शिक्षक-कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय लेखा व कोषागारे संचालनालयाने दूर करावा, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीने केली आहे. याबाबत पूर्ण चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन लेखा व कोषागारे संचालकांनी दिले आहे, असे आघाडीतर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT