मिठाई
मिठाई 
मुंबई

मिठाई विक्रेत्यांकडून एक्सपायरी डेटचे फलक लावण्यास टाळाटाळ 

शर्मिला वाळुंज

ठाणे ः खुली मिठाई विकताना विक्रेत्यांनी मिठाईसमोर तिच्या एक्‍स्पायरी डेटचे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. 1 ऑक्‍टोबर पासून या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने शहरातील मिठाई विक्रेत्यांना दिले आहेत. दोन दिवस उलटूनही अद्यापही मिठाई विक्रेत्यांनी या नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली नाही. मिठाईच्या समोर केवळ मिठाईचे नाव आणि त्याचे दर लावण्यात आल्याचे चित्र अनेक मिठाई दुकानांत दिसून येत आहे. 


नवरात्री, दसरा, दिवाळी सणांच्या काळात खवा, मिठाईला मोठी मागणी असते. मात्र शिळी मिठाई खाल्याने अनेकदा विषबाधा होण्याच्या घटना घडतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय अन्न सुरक्षा मानके प्राधिकरणाच्या आदेशानंतर अन्न व औषध प्रशासनाने खुल्या स्वरुपातील मिठाई विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना मिठाईच्या ट्रे जवळ त्याची एक्‍स्पायरी डेट लिहिणे बंधनकारक केले आहे. मिठाईचा उत्पादन दिनांक टाकणे बंधनकारक करण्यात आलेले नसून विक्रेते स्वच्छेने ती माहिती देऊ शकतात. 1 ऑक्‍टोबरपासून हे नियम आमलात आले आहेत. परंतू कल्याण, डोंबिवलीतील अनेक खुली मिठाई विक्रेत्यांनी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरु केली नसल्याचे दिसून येते. अनेक दुकानांत मिठाईच्या ट्रे जवळ केवळ मिठाईचे नाव त्याचे दर लिहिण्यात आलेले आहेत. परंतू इतर माहिती लिहीलेली दिसत नाही. काही ग्राहक स्वतःहून विक्रेत्यांना मिठाई ताजी आहे ना केवळ अशी विचारणा करताना दिसतात. 



ग्राहक मिठाईची खरेदी करतात तेव्हाच त्यांना अनेकदा मिठाई दोन दिवसांत संपवा अशी कल्पना विक्रेत्यांकडून देण्यात येते. खासकरुन मावा, खवा यापासून बनविलेले पदार्थ जास्त दिवस ठेवू नका असेही सांगण्यात येते. रबडी, रसमलाई सारखी मिठाई फ्रीजमध्ये दोन दिवस राहू शकते. ग्राहकांना तशी कल्पना देण्यात येते असल्याने त्यासाठी वेगळा माहितीची फलक अद्यापतरी आम्ही लावलेला नाही. ग्राहकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची काळजी आम्ही पहिल्यापासून घेत आलो आहोत. 
                   श्‍याम प्रसाद, मिठाई विक्रेते 

(संपादन ः रोशन मोरे)

Avoid putting up expiration date panels in front of sweets by sweet sellers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT