Aditya Thackery Sakal
मुंबई

Aditya Thackeray Ayodhya Visit: आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर

राज ठाकरेंना मागे टाकत बाजी मारली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अयोध्येच्या दौऱ्यासाठी राजकीय नेतेमंडळींमध्ये चढाओढ लागलेली असतानाच महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या आधी बाजी मारली आहे. तर दुसरीकडे मनसे मात्र स्थानिक विरोधामुळे अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने काहीशी बॅकफुटला आली असल्याचे दिसून आले आहे. आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा १५ जून म्हणजे आज आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंचा दिवसभराचा असा भरगच्च कार्यक्रम आहे. त्यामध्ये रामललाच्या दर्शनापासून ते सायंकाळी अयोध्येत शरयू नदीच्या घाटावर आदित्य ठाकरेंकडून आरती करण्यात येणार आहे.

सकाळी अकरा वाजता आदित्य ठाकरे हे लखनऊ एअरपोर्टला पोहचतील. दुपारच्या इस्कॉन मंदिराच्या भेटीनंतर दुपारी आदित्य ठाकरे अयोध्येत एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर हनुमान गढी आणि रामललाचे सायंकाळी दर्शन घेणार आहेत. सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान लक्ष्मण किला आणि ६.४५ वाजता शरयू नदीच्या घाटावर आरतीही करणार आहे. त्यानंतर ७.३० वाजता आदित्य ठाकरे हे पुन्हा लखनऊ एअरपोर्टने परतीच्या प्रवासाला निघतील.

राज ठाकरेंनीही याआधी अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. पण स्थानिक पातळीवर परप्रांतीयांच्या मुद्द्यावर स्थानिक खासदार बृजभूषण पांडे यांनी राज ठाकरेंना विरोध केला होता. मुंबईतील परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी माफी मागण्याची मागणी बृजभूषण पांडेंनी केली होती. विरोधामुळेच राज ठाकरेंनी आपला नियोजित दौरा रद्द केला. त्यानंतर मात्र राज ठाकरेंवर होणारी शस्त्रक्रिया आणि कोरोनाची झालेली लागण यामुळेच राज ठाकरेंचा दौरा लांबणीवर पडला आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरे यांनीही आपला दौरा जाहीर केला होता. हा दौराही १० जूनला सुरूवातीला रद्द झाला होता. मुंबईत राज्यसभेच्या खासदारांच्या निवडणुकीमुळे आदित्य ठाकरेंना हा दौरा पुढे ढकलावा लागला होता. मात्र आदित्य ठाकरेंनी वेळीच संधी साधत १५ तारखेला अयोध्या दौरा नियोजित करत बाजी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT