eknath shinde dasara melava 
मुंबई

Dasara Melava 2023: "..आणि आझाद मैदान तुडुंब झाले!" शिंदे गटाचे शक्ती प्रदर्शन यशस्वी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता २४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आझाद मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी मैदान तुडुंब भरले होते. तरुण आणि महिलांचा या मेळाव्यात लक्ष्यणीय सहभाग होता.

दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्यासाठी ठाणे, नवी मुंबई, मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यातून शिंदे गटाचा आमदारांनी जोर लावला होता. या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवार सकाळपासूनच राज्यभरातून कार्यकर्ते आझाद मैदानात दाखल होत होते.

दुपारी बारा वाजल्यानंतर गर्दी हळूहळू वाढू लागली. मेळाव्याची वेळ संध्याकाळी पाच वाजताची होती, मात्र पाच वाजेपर्यंत अर्धे मैदान रिकामेच होते. संध्याकाळी सहानंतर गर्दी वाढून मेळाव्याला विराट स्वरूप प्राप्त झाले. या मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची चोख व्यवस्था करण्यात आली होती. अल्पोपहाराची व्यवस्था कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आली होती. स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली होती. कार्यकर्त्यांना कोणतीही उणीव भासू नये, याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली होती.

मेळाव्यातील व्यासपीठावर शिंदे गटाचे सर्व आमदार उपस्थित होते. मध्यभागी शिवसेनाप्रमुखांचे आसन रिकामे ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांसह सर्व वक्त्यांची भाषणे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी सहा एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना नेण्या-आणण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही केली होती. ही वाहने पार्किंग करण्याची व्यवस्था केली होती.

आज फोर्टचा परिसर कार्यकर्त्यांमुळे गजबजून गेला होता. कार्यकर्ते खरेदी करताना दिसत होते तर गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी नरिमन पॉईंट फेरफटका मारून झाल्यानंतर सभेच्या ठिकाणी येत होते. फॅशन स्ट्रीटच्या भागात कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. त्यातच शिंदे गट शक्ती प्रदर्शन यशस्वी झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : वोटबँकेचं राजकारण बंद करा, सुरुवात नेहरुंनी केली होती!....राहुल गांधींच्या आरोपांना अमित शहांचं प्रत्युत्तर...

Mumbai Crime: मुंबईत प्रियकरासोबत लॉजवर गेली, शरीरसंबंध ठेवताना गुप्तांगाला दुखापत; सत्य लपवण्यासाठी तरुणीचा भलताच कारनामा

Pune News: बारामतीत हुतात्मा स्तंभाचे स्थलांतर करण्यास स्वातंत्र्यसैनिक संघटनेचा विरोध

'मी दोन वर्षं मेघनाचं पात्र जगले' जुळून येती रेशीमगाठी मालिकेची आठवण काढत भावूक झाली प्राजक्ता माळी, म्हणाली...'आदित्य आज सुद्धा...'

अरे हा लव्ह ट्रँगल नाही तर घोस्ट ट्रँगल ! 'बेटर-हाफची लव्हस्टोरी'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT