
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एका ३० वर्षीय महिला प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये लैंगिक छळाचा आरोप केला होता. रेल्वे पोलिसांच्या तपासात ही तक्रार खोटी असल्याचे समोर आले. ही महिला तिच्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवत होती. यादरम्यान तिच्या गुप्तांगाला दुखापत झाली. हे लपवण्यासाठी तिने बलात्काराचा खोटा आरोप केला. रेल्वे पोलीस आता हा खटला बंद करणार आहेत. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.