mumbai
mumbai  sakal
मुंबई

Mumbai News : लिंगपरिवर्तन केलेल्‍या ललितला पुत्ररत्न ; पाच वर्षांपूर्वी झाला होता विवाह

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पाच वर्षांपूर्वी लिंगपरिवर्तन करून पुरुष झालेला बीडचा रहिवासी असलेला पोलिस कर्मचारी ललित साळवे याला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. शस्त्रक्रियेनंतर २०२० मध्ये त्याने लग्न केले होते. त्याच्या पत्नीने नुकतेच गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

ललित साळवे याचा १९८८ मध्ये जन्म झाला होता. जन्मावेळी हार्मोनल असंतुलनामुळे ललितचे गुप्तांग सामान्य तयार झाले नव्‍हते. त्यामुळे त्याला आई-वडिलांनी मुलगी म्हणून वाढवले. २० ते २२ वर्षे ललित हा स्त्रीप्रमाणे जगला. तरुण वयात त्याला तो पुरुष असल्याचे समजले. त्यामुळे त्याने लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेसाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्याच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात २०१८ मध्ये प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर यांनी लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करून नवी ओळख मिळवून दिली.

शस्त्रक्रियेनंतर ललित यांनी २०२० मध्ये लग्न केले. १५ जानेवारीला त्यांच्या कुटुंबात गोंडस मुलाचे आगमन झाले आहे. माझ्यासाठी हे स्वप्नापेक्षा कमी नाही. लग्न करून वडील होईन, असे कधीच वाटले नव्हते. माझी लढाई ओळख मिळवण्यासाठी होती; पण देवाच्या आशीर्वादाने मला ओळख मिळाली आणि माझा संसारही स्थिरावला. पु

रुष असूनही स्त्रीचे जीवन जगणे माझ्यासाठी कठीण होते. माझी खरी ओळख शोधणे हे माझे ध्येय होते. माझा भूतकाळ माहीत असूनही सीमाने माझ्याशी लग्न केले. १५ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी माझ्या पत्नीने मुलाला जन्म दिला असून मी बाप झालो आहे.

- ललित साळवे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT