Akshay Shinde ESakal
मुंबई

Kalva News : मृत अक्षय शिंदे याचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी पोलीस संरक्षण व अंत्यसंस्कारासाठी जागा द्या! अक्षय शिंदे याच्या पालकांची सरकारकडे मागणी

नराधम अक्षय शिंदे याचे अंत्यसंस्कार बदलापूरमध्ये करू देणार नाही बदलापूरकरांची भूमिका.

किरण घरत

कळवा - बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याच्यावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केलेल्या पोलीस चकमकीत मृत्यू झाला. असे असताना त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांनी गोळीबार करून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करून त्यांच्या वकिलाच्या हस्ते पोलिसाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

याची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 25) ला पोलिसांच्या चकमकीवर शंका उपस्थित करून त्याचा मृतदेह बदलापूर येथील शासनाच्या जागेत अंत्यसंस्कार करावे, जेणे करून फॉरेन्सिकलॅब फिंगर प्रिंट पथकाला यापुढे कधी अजून चौकशी करण्यासाठी अडचण येणार नाही. असा आदेश दिल्याने आता पोलिसासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे.

त्याच्या पालकांनी त्याचा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात असलेला मृतदेह घेऊन जाण्यास तयार असून, हे घेऊन जाण्यासाठी पोलीस बंदोबस्त व बदलापूरमध्ये जागा मिळवून देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व बदलापूरच्या नागरिकांनी बदलापूरमध्ये नराधम अक्षय शिंदे याचा अंत्यसंस्कार करू न देण्याचा पवित्रा घेतल्याने बदलापूरमध्ये कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उभा राहू शकतो. त्यामुळे हा प्रश्न बदलापूर पोलीस व बदलापूर नगरपालिका कसा सोडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT