Badlapur Fire Accident Sakal
मुंबई

Badlapur Fire Accident : बदलापूरच्या केमिकल कंपनीत एका मागोमाग पाच भीषण स्फोट!

संपूर्ण कंपनी जळून खाक, एका कामगाराचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी!

सकाळ वृत्तसेवा

- मोहिनी जाधव

बदलापूर : बदलापूर पूर्व खरवई एमआयडीसी परिसरातील वी.के केमिकल कंपनी मधील ज्वलनशील रसायन भरलेल्या यंत्राचा दाब वाढल्याने, रासायनिक प्रक्रिया होऊन पहाटे ४.१५ ते ४.३० च्या दरम्यान झालेल्या स्फोटात कंपनी व परिसरात भीषण आग लागली.

यावेळी रात्रीच्या वेळेत ड्युटी वर असलेल्या पाच कर्मचाऱ्यांपैकी एकाचा घटनास्थळी आगीत सापडून जागीच मृत्यू झाला तर, इतर चार कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहाटे ४.१५ ते ४.३० च्या सुमारास खरवई परिसरात W-125 A विके केमिकल कंपनीत झालेल्या रासायनिक स्फोटाने चार ते पाच किमी अंतरावर जोरदार हादरे बसले. व आगीचे लोळ दिसून आले. यावेळी आग लागल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळताच त्यांनी अग्निशामक दलाला ही माहिती दिली.

माहिती मिळताच दोन्ही यंत्रणा घटनास्थळी पोहचली यावेळी आगीचे स्वरुप इतके भयानक होते की, या स्फोटात कंपनीच्या आत असलेले केमिकल ने भरलेले मोठमोठे पत्र्याचे पिंप उडून कंपनी बाहेरील उभ्या असलेल्या मालवाहू टेम्पो, ट्रक मध्ये येऊन पडले यामुळे आगीचे प्रमाण वाढले व ही वाहने देखील आगीत भस्मसात झाली.

ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने बदलापूर, अंबरनाथ व उल्हासनगर महानगरपालिका या तिन्ही शहरातून अग्निशामक गाड्या पाचारण केल्या. साधारण दोन ते अडीच तास प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या स्फोटात कंपनी व आजूबाजूच्या परिसरात आगीचे व धुराचे लोळ उठल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

स्फोटात झालेले नुकसान

वीके केमिकल कंपनी मध्ये झालेल्या स्फोटाचे स्वरूप इतके भयंकर होते की, कंपनीत असलेल्या ज्वलनशील रासायनिक अभिक्रियेत दाब वाढल्याने हा स्फोट झाला असल्याचे समोर येत असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली.

कारण या स्फोटात हे रासायनिक यंत्र जे जाड आवरणाच्या धातूचे बनले होते त्याचे तुकडे झाले असून, एक मोठा तुकडा बाहेरील झाडावर आदळून त्या धक्क्याने झाड कोसळले, तसेच दुसरा तुकडा हा पाठीमागच्या परिसरात असणाऱ्या कंपनीच्या आवारात जाऊन पडला.

तर छोटासा तुकडा हा दीड किमी परिसरात असलेल्या रहिवाशी इमारती मध्ये एका घरात जाऊन पडला असल्याची माहिती यावेळी भागवत सोनोने यांनी दिली. यावरुनच या स्फोटाची तीव्रता समजून येईल. तर यावेळी स्फोटाच्या तीव्रतेने कंपनीतील केमिकल ने भरलेले पिंप हे उडून कंपनीच्या आवाराच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनावर पडल्याने येथील मालवाहू अश्या चार ते पाच गाड्या यात जळून खाक झाल्या.

एक मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

स्फोट झाला त्यावेळी विके कंपनी मध्ये पाच कर्मचारी रात्रीच्या पाळीवर होते. यावेळी पहाटे स्फोट झाला त्यावेळी एक कर्मचारी जागीच जळून मृत्युमुखी पडला. तर चार कर्मचारी गंभीर जखमी अवस्थेत सापडल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कर्मचारी नावे व वय

प्रवीण रेवाळे - ४८ (जखमी)

सुरेश गायकवाड - ३९ (जखमी)

प्रकाश मोरे - ३९ (जखमी)

गिरीश कांबळे - ४३ (जखमी)

बबन मोहिते - ५२ (मृत्यू)

या कंपनीची पार्श्वभूमी पाहिली तर, यापूर्वी कंपनीच्या मालकीची आधीची कंपनी देखील आगीत च जळून गेली आहे. व डोंबिवली मध्ये सुद्धा याच मालकीच्या कंपनीला आग लागून त्या कंपनीचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी माहिती संबधित सूत्रांकडून मिळाली असून, या घटनेची सुद्धा चौकशी होणार असून, पुढील माहिती लवकरच समोर येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

G Ram Ji Bill: विरोधकांचा गोंधळ, घोषणाबाजी आणि कागदफाड... तरीही जी रामजी विधेयक लोकसभेत मंजूर; यात काय विशेष आहे?

Cameron Green: कॅमेरून ग्रीनच्या हाती TAX कापून किती रक्कम येणार? आधीच Welfare Fund मुळे ७.२० कोटी कापले जाणार...

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मारनच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Sangli Shaktipith : आधी इलेक्शन, मग नवे रेखांकन; शक्तिपीठ महामार्गावर सरकारची सावध पावले

Career Growth Astrology: मिथुन राशीसाठी 2026 ठरणार सुवर्णकाळ! गुरुच्या भ्रमणामुळे आयुष्यात लाभ अन् मोठी संधी

SCROLL FOR NEXT