मुंबई

Badlapur School Crime: आरोपी शिंदेला पोलिसांनी त्या चिमुकल्या मुलींसमोर आणलं अन्... वाचा ओळख परेडवेळी नक्की काय घडलं

Latest Mumbai News: या घटनेचे सूत्र हलणार असून, या खटल्याचा निकाल लागण्यासाठी ही परेड विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

latest Badlapur Crime News: बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी, नराधम आरोपी अक्षय शिंदेची पीडित मुलींसमोर कल्याण न्यायालयात अखेर काल ओळख परेड झाली असून, या पीडित मुलींनी आरोपीला ओळखले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही ओळख परेड अतिशय महत्त्वाची असून, यापुढे या घटनेचे सूत्र हलणार असून, या खटल्याचा निकाल लागण्यासाठी ही परेड विशेष महत्त्वाची ठरणार आहे.(Latest Thane News)

बदलापूर मध्ये शिशु वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच अत्याचार झाला. आणि शाळेत कर्मचारी असलेला नराधम अक्षय शिंदे याला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. मात्र या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले आणि २० ऑगस्ट रोजी शाळा परिसर तसेच रेल्वे स्टेशन मध्ये १० तास रेल रोको आंदोलन झाले. शेवटी या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली व फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालविण्याचे काम सुरु करण्यात आले. (Latest Crime News)

याचाच एक भाग म्हणून, खटला सुरु असलेल्या कल्याण न्यायालयमध्ये एका विशिष्ठ रूम मध्ये ही पीडित मुलिंसमोर आरोपीची ओळख परेड पार पडली . विशेष म्हणजे नॉन रिफ्लेक्टेड काचेच्या माध्यमातून ही ओळख परेड झाल्याने पीडित मुलगी आरोपीला पाहू शकत होती, मात्र आरोपीला पीडित मुलगी दिसत नव्हती.सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओळख परेड दरम्यान पुरेपूर दक्षता घेण्यात आली. (Latest Kalyan News)

याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआटीने न्यायालयात आरोपीच्या ओळख परेडसाठी परवानगी मागितली होती,त्यानुसार ही परवानगी मिळाल्यानंतर ही ओळख परेड पार पडली. या परेड दरम्यान मुलींनी आरोपीला ओळखले असल्याचे सांगण्यात येत असून, दरम्यान या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेची झालेली ओळख परेड अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.(Mumbai Local News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे विशेष गाड्यांचा कालावधी वाढवणार

SCROLL FOR NEXT