raj thackeray Sakal
मुंबई

Badlapur School Crime: राज ठाकरे बदलापूरकरांच्या भेटीला, गुन्हे दाखल झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबाची घेणार भेट!

Latest Raj Thackeray News|

सकाळ डिजिटल टीम

यामिनी जाधव

शिशु वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ता. २० ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन शाळेसमोर व रेल्वे ट्रॅक वर उतरुन केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी व घडलेल्या घटनेसंदर्भात तमाम बदलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ता. २८ रोजी बदलापूरकरांच्या भेटीसाठी येणार आहेत.

चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी, झालेल्या आंदोलनात १० तास रेल रोको आणि शाळे बाहेर झालेल्या उत्स्फूर्त आंदोलनात तमाम बदलापूरकर सहभागी झाले. यात अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच सहभागी झाले होते. मात्र आंदोलन चिघळल्यानंतर हे आंदोलन थोपविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज, अश्रू धुराचा वापर केला. तर रेल रोको या आंदोलनात आंदोलकांना रेल्वे रुळावरुन हटविण्यासाठी देखील लाठी चार्ज करण्यात आले.

यानंतर आंदोलन शमले मात्र दुसऱ्या दिवसांपासूनच आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली. काहींना या प्रकरणात अटक झाली. तर या भीतीपोटी काहींनी घरदार सोडले व अनेक तरुण तरुणी भीतीपोटी बाहेर लपून बसले आहेत. त्यामुळे या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या घरात देखील भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. यावेळी अनेक राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्था, त्याचबरोबर आम जनता देखील या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आहेत.

मात्र अद्याप हे गुन्हे मागे घेतले जात नसल्याने व ज्या आंदोलनकर्त्यांना या आंदोलनात लाठी चार्ज, व त्रास सहन करावा लागला. त्यासाठी या अटक होऊन जामिनावर सुटलेल्या आंदोलनकर्त्यांची व भीतीपोटी घरदार सोडून बाहेर वणवण भटकणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबाची होणारी तळमळ लक्षात घेऊन या सगळ्यांची भेट घेण्यासाठी व तमाम बदलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ता. २८ रोजी दुपारी १२ वाजता बदलापूर पश्चिम सानेवाडी येथील अदिती बँक्वेट हॉल या ठिकाणी येणार आहेत.

आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबांने व अटक होऊन जामिनावर बाहेर असलेल्या आंदोलनकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडण्यासाठी त्यांना भेटण्याचे आवाहन यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित कदम, मनसे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर, मनसे महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT