Dahi-handi 
मुंबई

बाळा नांदगावकर यांनी हंडी फोडलीच; पोलीस-मनसे आमनेसामने

कार्तिक पुजारी

मुंबई- राज्य सरकारचा आदेश झुगारुन दही हंडी उत्सव साजरा करण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. याप्रकरणात काळाचौकी येथे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी निर्बंध असतानाही दही हंडी फोडली आहे. त्यामुळे त्यांना आणि मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसे कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने आल्याचा पाहायला मिळत आहे. (Mhatashtra Latest News)

विरोध फक्त सणांना का? राजकीय नेते रॅली काढतात, सभा घेतात. त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यावेळी कोरोनाचा प्रसार होत नाही का? असा सवाल मनसेकडून करण्यात आला आहे. हिंदू सणांनाच विरोध का? सण साजरे केल्यानंतरच कोरोनाचा प्रसार होतो का? हिंदूंचे सण साजरेच करणार. आज दही हंडी फोडली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया बाळानांदगावकर यांनी दिली. नांदगावकर यांनी हंडी फोडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह इतर काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातलीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाकरे सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा निर्णय मान्य नसून त्यांनी दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा इशारा मनसेने दिला आहे. मनसेचे नेते दहीहंडीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

मनसेने दहीहंडीवर बंदी घालण्याचा विषय हिंदू सणांशी जोडला आहे. रात्रीपासूनच मुंबईत ठिकठिकाणी मनसे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली थर रचून दहीहंड्या फोडण्यात येत आहेत. मनसेकडून साजऱ्या होणाऱ्या या दहीहंडी उत्सवाचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आहेत. लोक एकत्र आल्यास कोरोनाचा प्रसार होईल, या भीतीपोटी राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT