Bhiwandi  sakal
मुंबई

Bhiwandi: तेलंगणातील भाजप आमदाराच्या सभेला खासदार बाळ्यामामांचा विरोध, भिवंडी शहरातील वातावरण खराब होण्याची शक्यता

T Raja: टी राजा सिंह यांच्या वक्तव्यामुळे भिवंडी शहरातील वातावरण खराब होण्याची शक्यता आहे

सकाळ वृत्तसेवा

Balya Mama Bhole: तालुक्यातील पडघा टोलनाका परिसरात सकळ हिंदू समाजाच्या वतीने भव्य सभेचे आयोजन शनिवारी करण्यात आले असून या सभेत तेलंगाना येथील आमदार टी राजा सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

परंतु नवनियुक्त खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी या कार्यक्रमास विरोध नसून या कार्यक्रमासाठी येणारे टी राजा सिंग यांना विरोध दर्शवला आहे. टी राजा सिंह यांच्या वक्तव्यामुळे भिवंडी शहरातील वातावरण खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे या कार्यक्रमास त्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी बाळ्या मामांनी शुक्रवारी पोलीस यंत्रणेकडे केली आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनावरून खासदार बाळ्या मामा यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.हा कार्यक्रम कपिल पाटील यांच्या छुप्या अजेंड्याने आयोजित केला असून पाटील स्वतः या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत आहेत. या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही.

परंतु मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवरच या कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आले असा सवाल बाळ्या मामा यांनी उपस्थित करत शहरात जातीय तेढ व भिवंडीत दंगली घडवण्याचा कट कपिल पाटील करित असल्याचा आरोप खासदार बाळ्या मामा यांनी केला आहे.

तेलंगणा येथील आमदार टी राजा सिंह यांच्यावर १०५ हुन अधिक गुन्हे दाखल आहेत तर १८ ते २० गुन्हे जातीय तेढ निर्माण करणारे आहे . भिवंडी मुस्लिम बहुल शहर आहे आणि अशा ठिकाणी जर जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य होत असेल तर वातावरण खराब होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या सभेला विरोध नसून या सभेमध्ये वक्तव्य करणारे टी राजा सिंह यांना विरोध असल्याचे बाळ्या मामा यांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर अनेक स्टेटस देखील फिरवले जात आहे. ज्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो त्यामुळे सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण पोलीस प्रशासनाकडे केली असल्याचेही बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT