bandra
bandra 
मुंबई

१५२ वर्षांपेक्षा जुन्या वांद्रे स्थानकाला मिळणार नवा लूक

सकाळ वृत्तसेवा, कुलदीप घायवट

मुंबई : दूरवरून नजरेत येणाऱ्या वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला नवी झळाळी देण्याचे काम सुरू आहे. वांद्रे स्थानक उपनगरीय मार्गावरील आकर्षक स्थानक असल्याने या स्थानकाला 'उपनगरीय राणी' असे संबोधले जाते. सुमारे 152 वर्षांपेक्षा जुन्या हेरिटेज ए-वन दर्जा असलेल्या वांद्रे स्थानकाला नवीन साज देण्याचे काम सुरू आहे. हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे.

मागील काही वर्षांत वांद्रे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय असून ऐतिहासिक स्थानक लोप पावत होतं. त्याचे संवर्धन व जपणूक करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या स्थानकाचे संपूर्ण संवर्धन व जपणूक करण्यासाठी 12 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी यंदाच्या जाहिर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  या हेरिटेज वांद्रे स्थानकातील मुख्य आकर्षण छप्पराचे आहे.

मंगलोर कौलांचा वापर करून वांद्रे स्थानकाचे छप्पर तयार करण्यात आले आहे. या छप्परावरील जीर्ण झालेल्या किंवा मोडलेल्या मंगलोरचे कौल काढल्या आल्या आहेत. मुख्य इमारतीची लाकडी चौकट मजबूत करणे, पॉलिश करण्याचे काम सुरू आहे. आता सध्या कौल टाकण्यासाठी सांगडा मजबूत केला जात आहे. इमारतीचे वासे, नवीन लाकडी छत बसविण्याचे काम केले जात आहे. यातून वांद्रे स्थानकाचे जुन्या रुपाला जिवंत ठेवून सौंर्दयीकरणाचे काम सुरू आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

वांद्रे स्थानक सुरू करण्याचा प्रस्ताव १८६४ साली मंजूर करण्यात आला. त्यानंतर १८६९ साली वांद्रे स्थानकातून लोकल सेवा सुरू झाली. वांद्रे स्थानकाचे सौंदर्यीकरण आणि फलाटाचे सुशोभिकरण करण्यात आले. हे काम १८८८ पर्यंत केले. या सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरणाच्या कामामुळे या वास्तूला १९९५ साली जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले. संवर्धनाचे काम २००८-०९ साली वांद्रे स्थानकाचे काम हाती घेतले होते. तर, २०१९ मध्ये पुन्हा एकदा सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले आहे.

वांद्रे स्थानकाला लाकडी आसने, एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. यासह हेरिटेज वास्तूचे सौंदर्यीकरण वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे वास्तूचे जुने जिवंत रूप टिकविण्यात येणार आहेत. वांद्रे स्थानकाला नवी झळाळी मिळाल्यावर येथे पर्यटकांची संख्या वाढणार आहे. कौलारू छताचा देखाव्याला सुंदरता देण्यात येणार आहे. यामध्ये ऐतिहासिक नक्षी आणि ऐतिहासिक कामाला कोणताही धोका न पोहचविता काम केले जात आहे. दरवाजे, खिडक्या, प्रवेशद्वार यांची दुरूस्ती केली जात आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT