Bangladeshi women were being trafficked 5 brokers arrested 7 Bangladeshi girls released police mumbai crime Sakal
मुंबई

Mumbai Crime : बांग्लादेशी महिलांची होत होती देहविक्री; 5 दलालांना अटक, 7 बांग्लादेशी मुलींची सुटका

देहविक्री व्यवसाय चालविणाऱ्या 5 दलालांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग व मानपाडा पोलिसांनी एकत्रित कारवाई करत अटक केली

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - नोकरीला लावतो, घरात कोणी आजारी असेल त्यांचे उपचार त्यासाठी पैसे देतो असे सांगत बांग्लादेशी महिलांना देहविक्री व्यवसायात ढकलले जात होते. देहविक्री व्यवसाय चालविणाऱ्या 5 दलालांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग व मानपाडा पोलिसांनी एकत्रित कारवाई करत अटक केली आहे.

दलालांचा म्होरक्या युनूस शेख उर्फ राणाला देखील अटक करण्यात आली असून 7 बांग्लादेशी मुलींची सुटका केली आहे. फ्रीडम फर्म या संस्थेच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील फ्रीडम फर्म ही संस्था महिला व मुलीची देह व्यापारातून सुटका करत त्यांचे पुनर्वसन करते. 5 ऑक्टोबर रोजी या संस्थेच्या कार्यालयात बांग्लादेश हून एक ईमेल आला. या ईमेल मध्ये एका 19 वर्षाच्या मुलीला नोकरी लावण्याचा बहाण्याने बांग्लादेश हून भारतात आणले असून ती मुलगी सध्या कुठे आहे याची माहिती देण्यात आली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेच्या पदाधिकारी शिल्पा वानखेडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पुण्याहून ठाणे गाठले. त्यांच्यासोबत रेश्मा तुपकर, आयोजक पुरोहित हे त्यांचे सहकारी होते. ठाण्याला येऊन त्यांनी ठाण्यात अँटी ह्यूमन ट्राफिकिंग सेलच्या अधिकाऱ्यांची भेट घेत सदर माहिती त्यांना दिली.

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, महिला पोलीस अधिकारी चव्हाण यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली. डोंबिवलीतील हेदूटणे गावाजवळ पोलिसांनी छापा टाकला. या वेळी सेलच्या अधिकाऱ्यांसोबत मानपाडा पोलीस देखील होते.

या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली. तपासा दरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. या सातही महिलांना बांग्लादेश मधून नोकरी देण्याचे आमिष दाखवून तर कुणाला उपचाराचे आमिष दाखवून भारतात आणण्यात आलं होतं. या मुलींसोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला त्यानंतर या मुलींना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आलं.

देह व्यापारास नकार देणाऱ्या मुलींना मारहाण देखील केली जात होती. पोलिसांनी या पाचही दलालांना बेड्या ठोकल्या आहेत. या पाच जणांचा म्होरक्या युनूस शेख उर्फ राणा आहे. यासोबतच साहिल शेख, फिरदोस सरदार, आयुब शेख, बीपलॉप खान अशी युनूसच्या अटक साथीदारांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes: जो रूटचं ऑस्ट्रेलियात पहिलंच शतक! ४० व्या सेंच्युरीनंतर खास सेलिब्रेशनही केलं; पण स्टार्कनेही ६ विकेट्ससह मैदान गाजवलं

Sakal Survey: मराठी संवर्धनासाठी महायुती सरकारचे प्रयत्न कितपत यशस्वी? ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात उलगडलं चित्र

Latest Marathi News Live Update : "मोहोपे" स्टेशनचे नाव "पोयंजे" रेल्वे स्टेशन असे करण्यात येईल

Silent Diseases Alert: 'हे' ५ शांतीत क्रांती करणारे आजार कधीच दाखवत नाहीत लक्षणं; डॉक्टर देतात वेळीच सावध होण्याचा इशारा

Sakal Survey 2025: महायुती सरकारची वर्षपूर्ती! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी कशी होती?

SCROLL FOR NEXT