Crime
Crime 
मुंबई

बॅंकेत भुयार खोदून चोरी करणाऱ्यास वसईत अटक

सकाळवृत्तसेवा

नालासोपारा - बॅंक ऑफ बडोदाच्या सानपाडा येथील शाखेतील चोरी प्रकरणात फरारी असलेल्या आरोपीला वसईत अटक करण्यात आली. वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. वालीव परिसरातील अन्य दोन घरफोडींच्या तपासादरम्यान आरोपी संजय बाळू कामडी (वय 30) याने बॅंक ऑफ बडोदा चोरी प्रकरणातील स्वत:च्या सहभागाची कबुली दिली.

कामडी हा वसईच्या फादरवाडी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्यासह विनोदकुमार हिरालाल सिंघवी याला वालीव परिसरातील दोन घरफोडीप्रकरणी अटक केली. या दोघांकडून सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान कामडी याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बॅंक ऑफ बडोदाच्या सानपाडा येथील शाखेत भुयार खोदून चोरी केल्याचे कबूल केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी ही माहिती दिली. कामडी याला 26 ऑक्‍टोबरला सापळा लावून अटक करण्यात आली होती.

मोकासह विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद
आरोपी कामडी याच्यावर मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, गुजरात यांसह अनेक ठिकाणी मोकासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्याची अटक महत्त्वाची होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT