ED esakal
मुंबई

Mumbai Crime : बँक फसवणूक प्रकरणी जेट एअरवेजचे नरेश गोयलांविरोधात ईडीने केला गुन्हा दाखल

जेट एअरवेजचे प्रवर्तक नरेश गोयल व इतर आरोपींविरोधात ईडीने नवीन गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - जेट एअरवेजचे प्रवर्तक नरेश गोयल व इतर आरोपींविरोधात ईडीने नवीन गुन्हा दाखल केला आहे. कॅनरा बँकेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात मनी लॉड्रीगच्या आरोपातून ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बुधवारी मुंबई व दिल्लीतील आठ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. या कारवाईत गोयल यांच्या संबंधित ठिकाणांचाही समावेश आहे.

कॅनरा बँकेचे वरिष्ठ अधिकारी पी. संतोष यांनी 23 नोव्हेंबर 2022 ला सीबीआयकडे या प्रकरणी तक्रार केली होती. 3 मे 2023 रोजी गोयल यांच्यासह इतर आरोपींविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, फौजदारी विश्वासघात, गुन्हेगारी नियमभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज पुरवठा जेट एअरवेजला करण्यात आला होता. जेट एअरवेजचे खाते बँकेने 5 जून 2019 मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार 538 कोटी 62 लाख रुपये बँकेचे नुकसान झाले होते.

याबाबत बँकेकडून पडताळणी करण्यात आली असता बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकरणात अज्ञात सरकारी अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT