vikhe patil
vikhe patil 
मुंबई

घातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टवर बंदी घाला - विखे पाटील

संजय शिंदे

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर घातक शस्त्रांची विक्री होत असल्याचे औरंगाबाद शहरात नुकत्याच सापडलेल्या शस्त्र साठ्यांवरून स्पष्ट झाल्याने फ्लिपकार्टवर सरकारने तातडीने बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की, औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीनंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवारी,चाकू, गुप्ती, कुकरी, जांबिया अशी सुमारे 28 शस्त्रांची खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांना वेळीच याचा सुगावा लागला व पुढचा अनर्थ टळला असला तरी अशा प्रकारे खुलेआम शस्त्र खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतील तर ते घातक आहे. त्यामुळे ऑनलाईन शस्त्र विक्री करणाऱ्या  वेबसाईट्सवर सरकारने तातडीने बंदी घालण्याची गरज आहे.

अलीकडच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात आता असे बेकायदेशीर व घातक व्यवहार होत असल्याचेही समोर आले आहे. औरंगाबादमध्ये हा शस्त्रसाठा कशासाठी मागवण्यात आला होता?त्याचा दंगलीशी काही संबंध आहे का?शस्त्र खरेदीत आणखी कोण-कोण गुंतले आहेत? याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही विखे पाटील यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT