kopari bhilwada 
मुंबई

'कोपरी'त देखील राबवला जातोय 'भिलवाडा' पॅटर्न 

सकाळवृत्तसेवा

ठाणे : शहराच्या पूर्व भागात म्हणजेच कोपरीत राजस्थानमधील भिलवाडा पॅटर्न राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील रहिवाशांनी दाखवलेली सर्तकता यामुळेच आता हा पॅटर्न यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. याशिवाय अत्यावश्‍यक सेवांसाठी येथील नागरिकांना घराबाहेर पडावे लागत नाही, कारण प्रत्येक गल्लीत जवळच्या दुकानदारांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना घरपोच सेवा मिळत आहे..

ठाण्यातील अनेक भागांत कोरोनाचा रुग्ण आढळून येत असला, तरी कोपरी त्यापासून दूर आहे. यासाठी पोलिस दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. तसेच नागरिकांनी स्वत: यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंग या नियमाचे पालनही केले जात आहे. तसेच या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय पातळीवरदेखील उपाययोजना केल्या जात आहेत.

राजस्थानमधील भिलवाडा भागातही एकाच दिवशी कोरोनाचे 14 रुग्ण आढळल्यानंतर "रॅपिड ऍक्‍शन' घेत विविध उपाय योजले होते. त्यानंतर 2 एप्रिलनंतर या भागात नवा कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. भिलवाडाचा हाच पॅटर्न आता कोपरीतही राबवला जात आहे. नागरिकांनी दाखवलेल्या सजगतेमुळे हा पॅटर्न यशस्वी होताना दिसत आहे. 

नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा दूरध्वनीवर घरपोच मिळत आहेत. आनंद नगर, बारा बांगला, सिडको बोगदा, हरिओम नगर चेक नाका या ठिकाणी आता पोलिसांची गस्त ठेवावी. पोलिस बळ कमी पडत असेल तर त्यासाठी आमचे स्वयंसेवक तैनात ठेवता येतील. यासंदर्भात निवेदन ठाणे जिल्हाधिकारी तसेच ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहे. 
- भरत चव्हाण, नगरसेवक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : गणपतीला कोकणात गेलेले परतीच्या मार्गावर, रेल्वे स्टेशनवर तुडुंब गर्दी

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल,आधुनिक स्वयंचलित तराफ्याद्वारे होणार विसर्जन

एक वर्ष झालं आजारी, गोष्टी हातातून निसटण्याआधी थांबायला हवं; जाकिर खानने केली मोठ्या ब्रेकची घोषणा

SCROLL FOR NEXT