मुंबई

भीमा कोरेगाव प्रकरण! वरावरा राव यांची तब्बेत ढासळली; उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका 

सुनिता महामुनकर


मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले लेखक, कवी वर्वरा राव (81) यांनी जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने राव यांचा जामीन अर्ज नुकताच नामंजूर केला आहे. या निर्णयाविरोधात राव यांनी अॅड. आर सत्यनारायणन यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. राव यांना दोन वर्षापूर्वी अटक करण्यात आली असून त्यांना सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. वयोवृद्ध असून विविध आजार आहेत. कोरोनाचा धोका कारागृहात अधिक आहे. त्यामुळे तात्पुरता जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कारागृह प्रशासन राव यांची नियमित वैद्यकीय तपासणी करीत नाही. त्यामुळे त्यांची तपासणीही करण्यात यावी, अशी मागणी राव यांच्यावतीने करण्यात आली आहे. आवश्यकता वाटल्यास स्वखर्चाने खासगी रुग्णालयात तपासणी तयारीही राव यांनी दर्शविली आहे. शनिवारी त्यांनी कुंटुंबियांना फोनवरून तब्येत ठीक नसल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपुर्वीच चक्कर येऊन कोसळले
वर्वरा राव काही दिवसांपूर्वीच कारागृहात चक्कर येऊन पडले होते. त्यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी, योग्य वैद्यकीय उपचार देण्यासाठी काही खासदार आणि कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले होते. याप्रकरणी राव यांच्यासह प्रा. सोमा सेन (61) यांचा जामीन अर्जही विशेष न्यायालयाने नामंजूर केला आहे. 

गौतम नवलखा यांनाही दिलासा नाही
दरम्यान, याप्रकरणी अन्य एक आरोपी विचारवंत गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज रविवारी विशेष न्यायालयाने नामंजूर केला. एनआयएने 90 दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी अर्जामध्ये केली होती; मात्र सध्याच्या परिस्थितीत आरोपपत्र दाखल करता आले नाही, असे एनआयएकडून सांगण्यात आले. नवलखा यांना आणखी दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, आरोपपत्र दाखल करण्यासाठी नव्वद दिवसांचा अवधीही तपास यंत्रणेला मंजूर केला. एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अकरा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT