मुंबई

Bhiwandi Crime: अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्याला बिहारमधून अटक

Mumbai Crime: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तो वेळोवेळी त्याची राहण्याची ठिकाणे बदली करीत होता.

सकाळ वृत्तसेवा

Latest Crime Update: भिवंडीतील पिराणीपाडा परिसरातील दारुल उलूम दिनीयात या मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर २० वर्षीय तरुणाने जबरी अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २४ ते २५ जून रोजीच्या दरम्यान घडली होती.

या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात पीडिताच्या आईच्या फिर्यादीवरून त्या तरुणा विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता.

दरम्यान त्यास तब्बल ४५ दिवसांनी शांतीनगर पोलिस पथकाने त्यास बिहारमधून ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तो वेळोवेळी त्याची राहण्याची ठिकाणे बदली करीत होता. त्यामुळे त्यास पकडण्यात अडचण येत होती.

परंतु गुप्त बातमीदाराने पोलिसांना त्याच्या राहण्याचा पत्ता दिल्याने त्यास बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातील धमसाईन गावातील जामा मस्जिदी जवळून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्यास न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तसेच शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी मोहीद्दिन शाह उर्फ बादशाह (३२) याचा शोध पोलिस घेत होते.त्याची गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, मोहिद्दिन उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रामपूर बजहा गावातील मित्राकडे जात असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुषंगाने वपोनि विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि (गुन्हे) अतुल अडूरकर,सुरेश चोपडे, पोह सय्यद, पोशि बर्वे,जाधव या पोलिस पथकाने उत्तर प्रदेशमध्ये रवाना होऊन चौकशी केल्यानंतर तो रेल्वे स्थानकाजवळील बाजारपेठ चौकातील तीन बत्ती मार्केटमध्ये पाकीट मारत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान पोलिसांनी त्यास रिक्षात जाताना पकडून ताब्यात घेत त्यास बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

FDA Action: 'सुलेमान मिठाईवाला'वर बडगा! मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित

Asian Games 2026 : भारतीय नौकानयनपटू 'संपावर' जाण्याच्या तयारीत! जपानमध्ये खेळाडूंकडून बंडाची भूमिका; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : गंगाखेड तालुक्यात गांजाची लागवड, ७६.९६ लाखांचा माल जप्त

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

SCROLL FOR NEXT