मुंबईः भिवंडी तालुक्यातील उबंरखांड पाच्छापूर जंगलात गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान पत्नी आणि तिन्ही मुलांचे मृतदेह पाहून वडिलांनी देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भिवंडी पोलिसांनी त्यांना मुंबई येथील जे जे रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असुनत्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद घेत चौकशी तपास सुरू केला आहे. हा घरातील अंतर्गत वाद किंवा जादूटोणा प्रकार झाला आहे का याबाबत पोलिस सविस्तर तपास करीत आहेत.
श्रीपत बच्चू बांगारे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तर त्याची मृत पत्नी रंजना (30) , मृत मुलगी दर्शना (12), रोहिणी (6) आणि मुलगा रोहित (9) असे झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेल्या चौघांची नावे आहेत. मात्र संशयास्पद आणि भयंकर अशा घटनेच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान उभे आहे.
भिवंडी तालुक्यातील उंबरखांड गावातील श्रीपत यांनी 21 ऑक्टोंबरला चौघेही माय - लेक बेपत्ता झाल्याची तक्रार पडघा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मात्र काल गुरुवारी दुपारच्या सुमारास श्रीपतचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता, त्याला एका झाडावरून दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्याने पहिले असता झाडाला सडलेल्या अवस्थेत चारही मृतदेह आढळून आले. या मृतदेहाच्या अंगावरील कपड्यामुळे त्यांची ओळख पटल्याने घटनेची माहिती भावाने श्रीपतला दिली. त्यांनतर पत्नी आणि 3 मुलांच्या मृत्यूंची बातमी मिळताच श्रीपतने स्वतः देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणे ग्रामीण विभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह भिवंडी आणि पडघा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून या बाबतीत नोंद घेत तपास सुरू केला आहे.
गेल्या महिन्यात शहापूर तालुक्यातील खर्डी नजीकच्या जंगलात अशाच प्रकारे तिघांचे मृतदेह आढळून आले होते. मात्र पोलिस तपासाअंती या तिघांनी तंत्रमंत्र विद्या शिकण्यासाठी आणिअमर होण्यासाठी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. आता अशाच प्रकारे झाडाला सडलेल्या आणि लटकलेल्या अवस्थेत हे चारही माय-लेकांचे मृतदेह आढळून आल्याने याप्रकरणी पडघा आणि भिवंडी तालुका विशेष पोलिस सखोल तपास करीत आहेत.
----------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Bhiwandi Crime two months missing Mother and three child dead body found on Tree
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.