leopard sakal
मुंबई

पडघा : वांद्रे येथे बिबट्या?, नागरिकांमध्ये घबराट

बिबट्या सदृश पिवळसर रंगाचा लांबलचक प्राणी दिसल्याची माहीती सरपंच, पोलीस पाटील व गावातील नागरिक विकास पाटील यांना दिली

सकाळ वृत्तसेवा

पडघा (बातमीदार) : भिवंडी (bhiwandi) तालुक्यातील पडघा खडवली रस्त्यावरील वांद्रे (Bandra) गावांच्या हद्दीत बिबट्या दिसल्याने नागरिकांच्यात घबराट पसरली आहे. दिनांक 5 आँगस्ट रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास वांद्रे (Bandra) गावातील शेतकरी बाळाराम बजागे भाजीपाला लागवड केलेल्या गावालगतच्या नदी किनाऱ्या जवळील शेतावर गेले असता त्यांना बिबट्या सदृश पिवळसर रंगाचा लांबलचक प्राणी दिसल्याची माहीती सरपंच, पोलीस पाटील व गावातील नागरिक विकास पाटील यांना दिली. (bhiwandi padgha area leopard panic citizens)

त्यांनी यांची खबर वनपरिक्षेत्र अधिकारी पडघा संजय धारवणे यांना देताच त्यांच्यासह वनपाल वन कर्मचाऱ्यांनी वांद्रे गावात मध्यरात्रीपर्यंत थांबुन खबरदारीचे उपाय म्हणून नागरिकांनी रात्री घराबाहेर पडु नये, एकट्याने बाहेर शेतावर जाऊ नये, लहान मुले, जनावरे यांची काळजी घ्यावी अशा प्रकारच्या सुचना गावात फिरून नागरिकांना आदिवासी वस्तीत केल्या.

तसेच ज्या ठिकाणी बिबट्या सदृश प्राणी आढळून आला त्याठिकाणी पाहणी केली असता वनकर्मचाऱ्यांना व नागरिकांना जंगली प्राण्याचे ठसे शेतात, माळरानावर, वाळुत आढळून आल्याने नागरिकांच्यात घबराट पसरली आहे. मात्र, तो बिबट्या असल्याचाच निष्कर्ष अद्याप निघु शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT