file photo
file photo 
मुंबई

जन्म-मृत्यूच्या नोंदणींची तपासणी बंधनकारक! 

- सुनीता महामुणकर

मुंबई : जन्म आणि मृत्यूची निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने नोंदणी करणाऱ्या नोंदींबाबत संबंधित प्रशासकीय कार्यालयांद्वारे तपासणी करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. यासाठी अधिकाऱ्यांची निश्‍चिती करून त्यांना जबाबदारी देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

जन्म आणि मृत्यूच्या दाखल्याची नोंद करताना अनेक प्रकारच्या तरतुदींचा भंग केला जात आहे, असे निदर्शनास आणणारी अनेक प्रकरणे न्यायालयांमध्ये दाखल होत असतात. अनेक प्रकरणांमध्ये जन्मतारखेची नोंद ही छाननी समितीकडून जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रानंतर अधिकृत करण्यात आलेली असते. अनेक प्रकरणांमध्ये उशिरा नोंदविलेल्या तारखांबाबत तपासणी किंवा छाननीही केली जात नसल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकरणांमुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल केली असून मुंबईसह राज्यभरातील सर्व महापालिका, नगर परिषदांना वरील निर्देश दिले आहेत.

जन्म-मृत्यू नोंदणी कायद्याच्या कलम 13 नुसार करण्यात आलेल्या तरतुदींचा भंग प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होता कामा नये, असे निर्देश न्या. सुनील शुक्रे आणि रोहित देव यांच्या खंडपीठाने दिले आहेत. यानुसार जन्म आणि मृत्यूची नोंद घडलेल्या दिवसानंतर तीस दिवसांमध्ये निबंधकाकडे होणे बंधनकारक आहे.

त्यापुढील आणि एक वर्षाच्या कालावधीमध्ये केलेल्या नोंदीबाबत नोटरीकडून आलेले प्रतिज्ञापत्र, विलंबशुल्क आणि अधिकाऱ्यांचे संमतीपत्र असणे बंधनकारक आहे. एक वर्षाच्या नंतर नोंदीसाठी आलेल्यांच्या नोंदी या प्रथमवर्ग महानगर दंडाधिकाऱ्यांमार्फत आणि पुरेशा सत्यता तपासणीनंतरच सशुल्क करणे बंधनकारक आहे. 

निर्देशांची माहिती छाननी समित्यांना द्या 
या प्रक्रियेचा भंग करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्याची तरतूदही यामध्ये आहे. संबंधित निर्देशांची माहिती राज्यभरातील छाननी समित्यांना देण्याचे निर्देशही न्यायालयाने रजिस्ट्रारना दिले आहेत. अशाप्रकारे कार्यवाही केलेल्या जन्म-मृत्यू नोंदींची नोंदणीच करावी, असेही आदेशात नमूद केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT