nawab malik
nawab malik  file photo
मुंबई

नवाब मलिक यांचे आरोप म्हणजे बेशरमपणाचा कळस - भाजपा

दीनानाथ परब

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन केंद्र सरकारवर काही आरोप केले आहेत. त्याला भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन पुरवलं तर कंपन्यांवर कारवाई करु, अशी केंद्र सरकारने धमकी दिली हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणचे बेशरमपणा, खोटारडेपणचाा कळस आहे. नवाब मलिक यांनी आपल्या आरोपाचे पुरावे द्यावे, अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी" असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

"ऑक्सिजनचा तुटवडा, ऑक्सिजन बेडचा तुटवडा, रेमडेसिव्हीरचा तुटवडा आणि यांचे मंत्री कुठल्या बिळात लपून बसेल आहेत. टि्वटरवरुन खोटे आणि बेशरमरणाचे आरोप करतायत. नवाब मलिक यांनी पुरावे द्यावे, अन्यथा राजीनामा देऊन, महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी असे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी काय आरोप केले?

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती हाताळण्यात केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. "केंद्राने मदत केली नाही तर औषध साठा जप्त करावा लागेल. योग्य नियोजन झाले नाही, तर हजारो मृत्यू होतील त्याला मोदी जबाबदार असतील" असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. नवाब मलिक महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. रेमडेसिव्हीर इंजेक्शन असो किंवा ऑक्सिजनचा पुरवठा यामध्ये मोदी सरकार महाराष्ट्राला सहकार्य करत नसल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse : सरकार, महापालिकेवर गुन्हा दाखल करा;नाना पटोले, मुंबईतील होर्डिंगमाफियांना संरक्षण

Rishabh Pant : 'जर मी शेवटच्या सामन्यात खेळलो असतो तर...' लखनौवरील विजयानंतर ऋषभ पंतचं प्लेऑफबाबत मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी पत्रकाराला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी!

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सापडले आणखी दोन मृतदेह! 14 वरून आकडा पोहचला 16 वर...काही जण अडकल्याची भिती

Share Market Today: शेअर बाजाराच्या रिकव्हरीत कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT