मुंबई

Niranjan Davkhare: कोकण पदवीधरमधून भाजपचे निरंजन डावखरे विजयी

विजयानंतर त्यांच्या ठाण्यातील घरी कार्यकर्त्यांनी एकच जल्लेष केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विधानपरिषदेसाठी झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे विजयी झाले आहेत. विजयानंतर त्यांच्या ठाण्यातील घरी कार्यकर्त्यांनी एकच जल्लेष केला. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन इथं शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केलं होतं. त्यांपैकी 1 लाख 32 हजार 071 मतं वैध ठरली तर 11 हजार 226 मतं अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66 हजार 036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला होता.

पहिल्या पसंतीची 1 लाख 719 मतं मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आले, अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी केली.

उमेदवारांना मिळालेली मतं पुढीलप्रमाणं

1) निरंजन वसंत डावखरे (भारतीय जनता पार्टी) - 1 लाख 719

2) कीर रमेश श्रीधर (इंडियन नॅशनल काँग्रेस) - 28 हजार 585

3) विश्वजित तुळशीराम खंडारे (भीम सेना) - 536

विजयानंतर प्रतिक्रिया देताना निरंजन डावखरे म्हणाले, "या मतदार संघामध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने हॅट्ट्रिक करत असतानाही पूर्ण ताकद महायुतीच्या कार्यकर्त्यांची आहे. ज्या ज्या शिक्षक संघटनांनी आम्हाला समर्थन दिलं आणि पूर्ण ताकद इथे उभी केली त्यांचा हा विजय आहे. रविंद्र चव्हाण यांच्या हाताला गुण आहे, अशीच प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळं मला चांगलं यश मिळालं, सर्व घटकपक्षांनीही माझ्यासाठी चांगलं काम केलं"

दरम्यान, भाजप नेते रविंद्र चव्हाण म्हणाले, "निरंजन डावखरे यांचा स्वभाव, त्याचं काम, गेली 12 वर्षांपासून लोकांमधील संपर्क, सरकारमध्ये असताना किंवा नसताना त्यांनी सर्व विषयांना प्राधान्य देऊन न्याय दिला. त्याचबरोबर या संपूर्ण मतदारसंघांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण भागात जी सेवा केली ती प्रत्येकाला माहिती आहे. चांगला उमेदवार उभा राहतो तेव्हा प्रत्येक जनतेला वाटतं हा निवडून यावा, म्हणून भरघोस मतांनी निरंजन डावखरे यांचा विजय झाला आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रासाठी काटेकोर पडताळणी अनिवार्य - बावनकुळे

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

Jintur Heavy Rain : येलदरी धरणातून २३ हजार ८०० क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT