मुंबई

भाजप नगरसेवकाची पालिका अभियंत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

दिनेश गोगी

उल्हासनगर : फाईलचोरीच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांनी आज दुपारी उल्हासनगर महानगरपालिकाचे शहर अभियंता महेश सितलानी यांना त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या कामगार संघटनेच्या हाके नंतर पालिकेच्या तमाम अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

प्रदिप रामचंदानी यांच्या नातलगांच्या नावावर असलेल्या कंपनीद्वारे पालिकेचे कंत्राट घेतले जातात. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रामचंदानी हे शहर अभियंता महेश सितलानी यांच्या कॅबिनमध्ये गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहितीच्या अधिकारात काही माहिती मागितली होती व काही देयकांची बिले होती. त्याची विचारणा करण्यासाठी रामचंदानी हे शहर अभियंता महेश सितलानी यांच्या कॅबिनमध्ये गेले होते. त्याचे उत्तर मिळत नसल्याने महिला अधिकारी दिप्ती लादे, कनिष्ठ अभियंता संदीप जाधव यांच्या समक्ष रामचंदानी यांनी सितलानी यांच्यावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळीचा वर्षाव केला.

हा प्रकार समजताच भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे युनिट अध्यक्ष राधाकृष्ण साठे, केशव लोणारे यांच्या हाकेवर पालिकेच्या तमाम कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत प्रदिप रामचंदानी यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा कामगार संघटनेने घेतला आहे.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता महेश सितलानी, कनिष्ठ अभियंता जितू चोईथानी, संदिप जाधव, तरुण सेवकानी, दिप्ती लाडे, अश्विनी आहुजा, संतोष राठोड आदींनी आयुक्त गणेश पाटील यांना निवेदन देऊन रामचंदानी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी महापौर पंचम कलानी, उपमहापौर जीवन इदनानी यांना देखील निवेदन दिले आहे. या प्रकरणी प्रदिप रामचंदानी यांच्याशी संपर्क साधला असता, माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती मिळत नसल्याने महेश सितलानी यांच्याशी विचारणा केली. समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने माहिती देण्यास का टाळाटाळ केली जाते हा तेव्हडा प्रश्न केला. शिवीगाळ केलीच नाही अशी प्रतिक्रिया रामचंदानी यांनी व्यक्त केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT