Raj Thackeray Ashish Shelar 
मुंबई

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला, BMC साठी नव्या समीकरणांची आखणी?

अपेक्षेप्रमाणे राजकीय वर्तुळात या भेटीमागे तर्क-वितर्क लावले जातील. राजकीय अर्थ काढले जाणार, हे निश्चित आहे.

सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार (Asish shelar) यांनी आज कृष्ण कुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांची भेट घेतली. दिवाळीमध्ये (Diwali) झालेली ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले, तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुका (Bmc Election) आता दूर नाहीत. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे राजकीय वर्तुळात या भेटीमागे तर्क-वितर्क लावले जातील. राजकीय अर्थ काढले जाणार, हे निश्चित आहे.

राज ठाकरे नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. आज पाडव्याच्या मुहूर्ताला ते नव्या घरी शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी कृष्ण कुंजच्या शेजारीच नवे घर बांधले आहे. राज ठाकरे आणि आशिष शेलार हे परस्परांचे चांगले मित्र सुद्धा आहेत. शिवसेनेने भाजपाची साथ सोडल्यामुळे भाजपा नव्या मित्राच्या शोधात आहे. भाजपा-मनसे युती होऊ शकते, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे.

युतीचा पहिला प्रयोग मुंबई महापालिका निवडणुकीत होऊ शकतो. मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या मनसेने आता हिंदुत्वाची वाट धरली आहे. भाजपही हिंदुत्वाच्या विचारसरणीला मानणारा पक्ष आहे. त्यामुळे हिंदुत्व दोन्ही पक्षांना जोडणार समान धागा आहे.

पुढच्यावर्षाच्या सुरुवातील फेब्रवारी महिन्यात मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे. काहीही करुन शिवसेनेला पालिकेत सत्तेतून खाली खेचण्याचा चंग भाजपाने बांधला आहे. त्या दृष्टीने भाजपा आखणी करत आहे. भाजप-मनसे एकत्र आल्यास शिवसेनेसमोर निश्चित आव्हान निर्माण होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT