मुंबई

कोरोनाला घाबरून "घरात" लपून का बसला होतात?, भाजप आमदाराचा शिवसेनेला सवाल

मिलिंद तांबे

मुंबई: शिवसेनेने जाहीर केलेल्या संपर्क अभियानावर आमदार अँड आशिष शेलार यांनी बोचरी टीका केली. घराघरात जाताय? जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत. त्यांना विचारायचे आहे. कोरोनाला घाबरून "घराघरात" लपून का बसला होतात? मुख्यमंत्र्यांसह सगळे तुम्ही तेव्हा कुठे होतात? एकही रुपयांची मदत का दिलीत नाहीत? अवाजवी वाढीव वीज बिले पाठवून का छळताय? असे प्रश्न त्यांनी उपस्थितीत करत शिवसेनेसह मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली.

बिल्डर, दारूवाले, टाटाना सवलतीची खैरात, मग समान्य मुंबईकरांना काय दिलेत? समुद्राचे पाणी गोडे करायला निघालात पावसाचे पाणी घरात घुसते त्याचे काय? आता उपनगरात एनए टँक्स वसूली करुन पाकिटमारी का करताय?, असे बरेच हिशोब मुंबईकरांचे बाकी आहेत त्यामुळे जाच तुम्ही घराघरात, असा टोला भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला आहे.

राज्यात वाढत असलेल्या कोरोनाबाबत ते म्हणाले की, लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला. कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणच झाले नाही. सरकार अपयशी ठरले. महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. लसीबाबत प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोग्य मंत्री काय कारवाई करणार? असा सवाल ही त्यांनी केला आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BJP MLA Ashish Shelar criticizes Shiv Sena over Corona Increasing patient

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT