BJP NCP and Congress walk out from online budget meeting sakal
मुंबई

अर्थसंकल्पाच्या ऑनलाइन बैठकीतून भाजप,राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सभात्याग

अर्थसंकल्पाची प्रत नगरसेवकांना मिळाली नाही तसेच अर्थसंकल्प हा ऑफलाईन घेण्यात यावी अशी मागणी या स्थायी समिती सदस्यांनी केली

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिकेचा 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या ऑनलाईन बैठकीमधून कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे,सुहास देसाई तसेच भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी सभात्याग केला.

अर्थसंकल्पाची प्रत नगरसेवकांना मिळाली नाही तसेच अर्थसंकल्प हा ऑफलाईन घेण्यात यावी अशी मागणी या स्थायी समिती सदस्यांनी केली .मात्र या सर्व सदस्यांच्या सूचनाना न जुमानता अर्थसंकल्प ऑनलाईन सादर करण्यात आल्याने या सर्व सदस्यांनी ऑनलाईन बैठकीमधून सभात्याग केला.शिवसेनेचे सदस्य मात्र या ऑनलाईन सभेत उपस्थित राहिले.आयुक्तांचे अर्थसंकल्पाचे ऑनलाईन भाषण झाल्यानंतर सर्वाना अर्थसंकल्पाची प्रत देण्यात येईल असे आश्वासन सचिव अशोक बुरपुल्ले यांनी यावेळी दिले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT