fadanvis thackeray Sakal
मुंबई

Mumbai News : भाजप-ठाकरे गट मुंबईत आमने-सामने; देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेनंतर दोन्ही पक्षांत ‘सामना’

शिवसेना-भाजप युती तुटणे आणि शिवसेना पक्ष फुटणे या दोन्ही घटनांमागच्या इतिहासावरून हे दोन्ही पक्ष हातघाईवर येऊ लागले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना-भाजप युती तुटणे आणि शिवसेना पक्ष फुटणे या दोन्ही घटनांमागच्या इतिहासावरून हे दोन्ही पक्ष हातघाईवर येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एका दैनिकाच्या अग्रलेखातून केलेल्या टीकेनंतर शनिवारी भाजप आणि ठाकरे गट आमनेसामने आले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत विविध ठिकाणी निदर्शने केली. भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसैनिकही रस्त्यावर उतरले. दरम्यान,खासदार अनिल देसाई, आमदार अजय चौधरी, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामना कार्यालयाबाहेर मोठी गर्दी करत जागता पहारा दिला. त्यामुळे मुंबईत काही भागात तणावाची स्थिती होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी शिर्डी येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात ‘‘मी पुन्हा येणारच होतो, पण काहींनी बेइमानी केली. मात्र जेव्हा आलो तेव्हा त्यांचा अख्खा पक्षच घेऊन आलो,’’ असा टोला हाणत ठाकरे गटाच्या जखमेवर मीठ चोळले होते.

त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जळजळीत भाषेत कोरडे ओढले. संजय राऊत यांची बोचरी टीका जिव्हारी लागल्याने भाजपचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तर संजय राऊत यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

भाजपच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून खासदार संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच वृत्तपत्राची जाळपोळ करत, निषेध नोंदविण्यात आला. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची या वेळी धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले.

आमदार आशिष शेलार यांनी ‘सामना’च्या कार्यालयावर धडक देण्याचा इशारा दिला. तर, अनुचित प्रकार टाळण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर आले आहेत. भाजपने आततायीपणा केल्यास शिवसेना स्टाइल उत्तर देऊ, असा इशारा या वेळी शिवसैनिकांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT