devendra fadanvis
devendra fadanvis 
मुंबई

मराठा आरक्षणासाठी भाजप सरकारचे प्रामाणिक प्रयत्न - मुख्यमंत्री

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी अतिशय प्रामाणिक व गंभीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाचेच सरकार करत असून हे आरक्षण देण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. 26) केले.

भाजपाच्या प्रदेश माध्यम विभागाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलते होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये व प्रबोधिनीचे महासंचालक रविंद्र साठे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही नेते मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या सरकारचे प्रयत्न जनतेपर्यंत पोहचवावेत. त्यांनी सांगितले की, पक्षाचे प्रवक्ते, चर्चा प्रतिनिधी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख व सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाने व सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवावीत. प्रसिद्धीप्रमुख हा पक्ष – सरकार व जनता यांच्या दरम्यान महत्त्वाचा दुवा आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT