The block development officers cabin was locked by villagers of saralgaon
The block development officers cabin was locked by villagers of saralgaon 
मुंबई

सरळगावात गटविकास अधिकारी यांच्या कॅबीनला ठोकले टाळे

नंदकिशोर मलबारी

सरळगाव (ठाणे) -  मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानीच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांच्याकडे केलेल्या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्याने पंचायत समिती सदस्य, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी यांच्या कॅबीनला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला.       

अनेक महिने गटविकास अधिकारी व पंचायत समितीच्या सदस्यांमध्ये तू- तू मै-मै सुरु आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचा आरोप हे सदस्य करीत आहेत. गटविकास अधिकारी यांच्या बदलीची मागणी करूनही जिल्हापरीषद याची दखल घेत नाही. तो पर्यंत आम्ही प्रशासकीय काम काम करून देणार नाही, अशी भूमिका आता भाजपानेही घेतल्याने जनतेचे लक्ष या घटनेकडे लागले आहे. आज सकाळी 11 वाजता गटविकास अधिकारी यांच्या विरोधात घोषणा देत सभापती जनार्दन पारधी, भाजपा तालुका अध्यक्ष जयंत सुर्यराव, मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शीतल तोंडलिकर, उपसभापती सीमा घरत, पंचायत समितीचे गट नेते श्रीकांत धुमाळ, शहर अध्यक्ष रूपेश गुजरे, पंचायत समितीचे सर्व सदस्य व भाजपाचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा टाळा ठोकण्यात आला. जो पर्यंत प्रशासन गटविकास अधिकारी एस. ई. ए. हाश्मी यांची बदली होत नाही तो पर्यंत पंचायत समितीचे प्रशासकीय काम सुरु होऊ देणार नसल्याची भूमिका सर्व सदस्यांनी घेतल्याने या घटनेबद्दल प्रशासन कोणती भूमिका घेते या कडे लक्ष लागले आहे. मनमानी करून प्रशासन चालवित असलेल्या गटविविकास अधिकारी यांच्या विरोधात घेतलेली भूमिका शासनालाही कळावी या साठी तहसीलदार मुरबाड व पोलिस ठाणे मुरबाड यांचा लेखी पत्र देऊन कळविण्यात आल्याची माहीती माजी उपसभापती अनिल घरत यांनी  दिली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT