Blue jelly fish found in  Axa Beach
Blue jelly fish found in Axa Beach  
मुंबई

आक्‍सा बीचवरही 'ब्ल्यू बॉटल्स'ची दहशत 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : जुहू व गिरगाव चौपाटीपाठोपाठ आक्‍सा बीचवरही 'ब्ल्यू बॉटल्स' या  सागरी जिवांची दहशत निर्माण झाली आहे. 'ब्ल्यू बॉटल्स'चा विषारी दंश टाळण्यासाठी नागरिकांनी किनारपट्टीवर जाऊ नये, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

शनिवारी आक्‍सा बीचवर बहुतांश पर्यटकांना 'ब्ल्यू बॉटल्स'चा दंश झाला. प्रथमोपचारानंतर पर्यटकांनी त्वरित किनारपट्टी सोडून दिली. ब्ल्यू बॉटल्सचा दंश होत असल्याने किनाऱ्यांना भेट देऊ नका, असे आवाहन पालिकेकडूनही करण्यात आले आहे. 

आठवड्याभरापूर्वी गिरगाव व जुहू किनारपट्टीवर 'ब्ल्यू बॉटल्स' मरिन लाइफ ऑफ मुंबईच्या सदस्यांना आढळले होते. गतवर्षीही 'ब्ल्यू बॉटल्स'च्या दंशामुळे अनेक जण जखमी झाले होते. निळ्या पिशवीसारखी बाह्यरचना असल्याने 'ब्ल्यू बॉटल्स' या सागरी जिवांकडे नागरिक आकर्षित होतात. मात्र, त्यांना हातात घेतल्यास खालच्या बाजूला असलेल्या दोऱ्यांद्वारे विषारी दंश होतो. मात्र, आठवड्याच्या सुटीमुळे किनाऱ्यांवर पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गिरगाव व आक्‍सा बीचवरच्या पर्यटकांना या सागरी जिवांचा फटका बसत आहे. गुरुवारी एक रुग्ण 'ब्ल्यू बॉटल्स'च्या दंशामुळे नायर रुग्णालय दाखल झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे.

दरम्यान, जुहू किनाऱ्यावर दोन दिवसांपासून 'ब्ल्यू बॉटल्स' दिसत नसल्याची माहिती स्थानिक सुरक्षा रक्षकांनी दिली. पालिकेकडून या भागांत 'ब्ल्यू बॉटल्स'ची माहिती देणारे व किनाऱ्याला भेट न देण्याचे आवाहन करणारे फलकही लावण्यात आले आहेत.

ब्ल्यू बॉटल्स चावल्यास - 

- पायाला ब्ल्यू बॉटल्स चिकटल्यास त्वरित थंड पाणी टाका. 

- थोड्या वेळाने वेदनेच्या ठिकाणी गरम पाणी टाका.

- जांघेत गाठ आल्यासारखे वाटत असेल तर त्वरित डॉक्‍टरांना दाखवा. 

- वेदनेच्या ठिकाणी व्हीनेगर किंवा लिंबू लावू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT