मुंबई

बोरीवली, दहिसरमधल्या नागरिकांसाठी पालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

पूजा विचारे

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे शहरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे असंच चित्र निर्माण झालं आहे. तसंच झोपडपट्टी नसलेल्या भागातही कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत.  मुंबई पालिकेचा आर उत्तर वॉर्ड, ज्यात बोरीवली आणि दहिसर हा भाग येतो. या वॉर्डमधील गृहनिर्माण संस्था आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना पालिकेकडून अनेक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यात सुरक्षा रक्षक आणि घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता पालिकेनं हे पाऊल उचललं आहे. पालिकेनं दिलेली मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोविड सुरक्षा नियमांचा समावेश आहे. 

आर उत्तर वॉर्डचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश वायदांडे यांनी शनिवारी एक वेबिनार आयोजित केले होते. यावेळी त्यांनी नागरिकांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये त्यांनी जिम आणि स्विमिंग पूल या भागात एकत्र जमणं टाळावं. तसंच घराबाहेर पडताना अवश्य मास्कचा वापर करावा. कोविडच्या नियमांचं पालन करावं. सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर सॅनिटायझचा वापर अवश्य करणं त्यासोबतच नियमितपणे हात धुणे, अशा सूचना वायदांडे यांनी दिल्या आहेत. 

यासोबतच सुरक्षा रक्षक, घरकाम करणारे कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांची दररोज तपासणी करावी. हे कर्मचारी बीएमसी दवाखान्यात जाऊनही नियमितपणे तपासणी करु शकणार आहेत, असं वायदांडे यांनी सांगितलं आहे. 

आर-उत्तरचा ग्रोथ रेट 0.31% आहे, जो शहराच्या एकूण वाढीच्या 0.37% च्या जवळपास आहे.

एका पालिका अधिकाऱ्यानं सांगितलं की, कोरोनाच्या सुरुवातीच्या महिन्यात सोसायटीमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे तापमान तपासले जातं. सोसायटी आवारात प्रवेश करणाऱ्यांचे थर्मल गनच्या साहाय्याने काटेकोरपणे निरीक्षण केले जात असून एसपीओ २ पातळीही तपासण्यात येते. मात्र आता लोकं ही सवय मोडताना दिसत आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान या वेबिनारमध्ये आम्ही परिसरातील लसीकरण केंद्रांविषयी स्थानिकांना माहिती दिली असल्याचं डॉ. वायदांडे यांनी सांगितलं आहे. 

प्रभागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी कोविड प्रोटोकॉलची आठवण करून देण्यासाठी बीएमसीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र तरीही आपल्याला स्वतःची आणि आपल्या आसपासच्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोविडच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं घोसाळकर यांनी म्हटलं आहे.

BMC guidelines housing societies R North ward Borivli Dahisar Avoid gym pool

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT