BMC relief to Ganeshotsav mandal Mumbai ganpati idol makers big relief bmc given permission
BMC relief to Ganeshotsav mandal Mumbai ganpati idol makers big relief bmc given permission sakal
मुंबई

मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांना BMC चा दिलासा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या वर्षी पीओपी च्या मूर्त्यांच्या वापरासाठी दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांसाठी जारी केलेल्या आवाहनामध्ये मूर्तीच्या उंचीसाठीही सूट  मिळाली आहे हे विशेष. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आवाहनानुसार पीओपी वापरावर मर्यादा आलेल्या आहेत. पण गेल्या दोन वर्षातील कोरोनाच्या महामारीची परिस्थिती पाहता यंदाच्या वर्षी तरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करूद्या, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली होती. या आवाहनाला मुंबई महानगरपालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे गणेशोत्सव उत्सव साजरा करण्यासाठी मर्यादा आल्या होत्या. कोविडच्या नियमावलीमुळे नियमावली आणि मार्गदर्शकांचे पालन करत गणेशोत्सव मंडळांनी मुंबई महानगररपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. पण यंदाच्या वर्षी मात्र गणेशोत्सव मंडळांनी मुंबई महानगरपालिकेकडे आवाहन करत, मोठा उत्सव साजरा करण्यासाठी यंदा परवानगी द्या, अशी मागणी केली होती. राज्य सरकार तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे हा विषय प्रलंबित होता. अखेर आज गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मूर्तीची उंची ही शक्य तितकी कमी असावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर घरगुती गणेशमूर्तींसाठी मूर्तीची उंची 2 फुटांपेक्षा अधिक नसावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. पीओपी मूर्तीएवजी शाडू मातीपासून घडवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यामुळे नैसर्गिक तलावात या मूर्तीचे विसर्जन करणे सोयीचे होईल.

गणेशोत्सव मंडळांनी पीओपीच्या मूर्त्यांसाठी यंदाही सुरूवातीपासूनच नकारघंटा वाजवली होती. सध्या मिळालेला कालावधी अतिशय तोकडा असून इतक्या कमी कालावधीत पीओपीला पर्यायी अशा शाडूच्या मातीच्या मूर्त्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी निर्माण करणे शक्य नसल्याचे मंडळांकडून सांगण्यात आले होते. तसेच शाडूच्या मातीच्या मोठ्या मूर्त्या तयार करण्यात अनेक अडचणी असल्याचेही मंडळांकडून सांगण्यात आले होते. पीओपीच्या मूर्त्या या नैसर्गिक तलाव आणि जलाशयांमध्ये विसर्जित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बंदी घातली आहे. तसेच गणेशोत्सव मंडळांना आणि नागरिकांना पीओपीच्या मूर्त्या खरेदी किंवा विक्री करू नये असेही आवाहन केले आहे. गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करून पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तीचे पर्यावरणाच्या दृष्टीने परिणाम होतात. पीओपीपासून घडवलेली मूर्ती विसर्जित केल्यानंतर पाण्यात विघळत नाही. परिणामी अशा मूर्तीचा गाळ विहिरी, तलाव तसेच जलाशयात साचतो. त्यामुळे जलायशाचे जिवंत झरे बंद होतात. पीओपी मूर्तीवर रासायनिक रंगाचे लेपन असते. त्यामुळे मूर्ती विसर्जनानंतर जल प्रदुषण होऊन जलचरांनाही धोका निर्माण होतो, असेही महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

मोठ्या गणेशोत्सव मंडळाच्या सध्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे मूर्त्यांसाठीच्या ऑर्डर अद्यापही आलेल्या नाहीत. गणेशोत्सव मंडळांच्या उंचीच्या आणि मटेरिअल वापराच्या मागणीनुसार आम्ही सज्ज आहोत. पण अवघा सव्वा महिना उरलेला असल्याने सध्याच्या घडीला पीओपीचा पर्याय हा मूर्त्यांची कामे वेगाने पूर्ण कऱण्यासाठी उपयुक्त ठरेल असे वाटते.

- रेश्मा खातू मूर्तीकार

गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या वर्षी मोठा उत्सव करण्यासाठी महापालिकेचा एक सकारात्मक दिलासाच म्हणता येईल. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी नियमावलीत दिलासा मिळाल्याने गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा आहे.

- प्रकाश बाडकर गणेशोत्सव मंडळ परीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT