मुंबई

अतिक्रमण असलेल्या जमिनींबाबत मुंबई मनपाने घेतला महत्त्वाचा निर्णय

समीर सुर्वे

मुंबई, ता. 23: अतिक्रमण असलेले भुखंड ताब्यात न घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. भुखंड हस्तांतरण करताना तसा आग्रह जिल्हाधिकार्यांकडे धरण्यात येणार आहे. विविध आरक्षणासाठी आरक्षित असलेले खासगी भुखंड मुंबई महापालिका जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मार्फत खरेदी करते. मात्र, राखीव भुखंडांवर अतिक्रमण असल्यास ते ताब्यात आले तरी त्यांचा फारसा फायदा होत नाही. उलट भुखंडावरील रहिवाशांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पालिकेवर येते. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

यापुढे महानगरपालिका अतिक्रमण असलेली जमिन ताब्यात न घेता ती जमिन अतिक्रमण मुक्त करुन ताब्यात घेण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासनाकडून महासभेत सादर करण्यात आली आहे.

यापुर्वी मुंबई महानगरपालिका पालिकेने अतिक्रमण असलेल्या जागा ताब्यात घेतल्या आहेत. त्यांच्यावर आता झोपू योजना राबविण्यात येत आहे. यात अंधेरी येथील 10 हजार 792 चौरस मिटरची मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजन राबविण्यात आली आहे. त्यातील 33 टक्के जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे.

तर, चेंबूर येथील 57 हजार 908 चौरस मिटरच्या आरक्षित भुखंडावरही आता झोपू योजना राबविण्यात येणार आहे. यातील काही भाग पालिकेला हस्तांतरीत होणार आहे. अशा प्रकारे अतिक्रमण असलेले भुखंड ताब्यात घेतल्यास त्याचा फारसा फायदा पालिकेला होत नाही असा दावा प्रशासनाने केला आहे.

( संपादन  - सुमित बागुल )

bmc took important decision regarding lands with illegal encroachment

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT