मुंबई

स्थापत्य अभियंत्याला मारहाण प्रकरण: जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

- सुनीता महामुणकर

मुंबई:  सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणात एका युवकाला मारहाण केल्या संबंधित प्रकरणात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानातील गेल्या वर्षीच्या संपर्क तपशील नोंद ( सीडीआर) आणि ग्राहक तपशील नोंद (एसडीआर) परत मिळवण्यासाठी  टेलिकंपनीची मदत घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.

तक्रारदार अनंत करमुसे यांनी केलेल्या याचिकेत संबंधित डेटा कायम ठेवण्यासाठी तातडीने उपाय करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी मोबाईल कंपन्या निर्देश द्यायला हवे असे ही सांगण्यात आले. याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे, मात्र कॉल डाटा बाबत माहिती नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आव्हाड यांच्या निवासस्थानी हा प्रकार घडल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

गेल्या वर्षी ८ एप्रिलला आव्हाड यांच्या ठाणे येथील बंगल्यावर त्यांच्या समर्थकांनी स्थापत्य अभियंत्याला  मारहाण केली होती. आव्हाड यांच्या उपस्थितीत ही मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी आव्हाड यांना आरोपी केलेले नाही. त्यामुळे आव्हाड यांना आरोपी करण्याचे आदेश देण्याची आणि प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याची मागणी स्थापत्य अभियंता अनंत करमुसे यांनी याचिकेद्वारे केली आहे.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी युक्तिवाद करताना मारहाणीच्या घटनेला ८ एप्रिलला एक वर्ष पूर्ण होईल. त्यामुळे मारहाण झाल्याचा पुरावा असलेला सीडीआर आणि एसडीआर आपोआप नष्ट होईल. पोलिसांनी तो मिळवून जपून ठेवण्याची गरज असल्याचं याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड्. आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आला असल्याची माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bombay High Court ordered Subscriber Detail Record and call detail records of Jitendra Awhad

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला, पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना, नेमकं काय घडलं?

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ! फॉर्मात असलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार, फ्रँचायझीने त्याच्या जागी कुणाला घेतले पाहा...

Nashik News : ‘टीसीएस’मधील दानिशच्या मोबाईलचा ‘क्लोनिंग’ अहवाल ‘एसआयटी’कडे

विदर्भात उष्णतेची लाट कायम; सोमवारी अमरावती सर्वाधिक हॉट, ४६.६ अशं तापमानाची नोंद; अकोल्याला टाकलं मागे...

Solapur Sand : भीमा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा, ठेकेदार–महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताविरोधात ग्रामपंचायत सदस्यांची जिल्हाधिकाऱ्याकडे धडक तक्रार

SCROLL FOR NEXT