Amruta Fadnavis Blackmail Case 
मुंबई

Amruta Fadnavis Blackmail Case: अनिल जयसिंघानीला हायकोर्टाचा झटका, पण...

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अनिल जयसिंघानी सध्या कोठडीत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई हायकोर्टानं झटका दिला असून त्याची जामीन याचिका फेटाळली. पण त्याचा जवळचा सहाकारी बुकी निर्मल जयसिंघानी याला मात्र जामीन मंजूर केला.

अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी हे दोघे बुकी असून अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. अनिल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी २० मार्च रोजी गुजरातमधून अटक केली होती. यापूर्वी जयसिंघानीची मुलगी आणि सहआरोपी अनिक्षा जयसिंघानी हिची जामिनावर नुकतीच सुटका झाली आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं?

दरम्यान, अॅड. अजय मिसर यांनी अनिल जयसिंघानीच्या जामीनाला विरोध करता संपूर्ण कट कारस्थान अनिल जयसिंघानीसाठी रचलं गेल्याचं कोर्टाला सांगितलं. अमृता फडणवीस यांनी आपल्या तक्रारीतही म्हटलं होतं की, अनिक्षा हीन तिच्या वडिलांविरोधातील प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी त्यांना लाच देण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीडी अल्माले यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अनिल जयसिंघानीची याचिका फेटाळली. पण दुसरा आरोपी निर्मल जयसिंघानी याचा जामीन मंजूर केला.

२० फेब्रुवारी रोजी दाखल झाला होता गुन्हा

मालाबार पोलिसांत २० फेब्रुवारी रोजी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी या दोघांवर गुन्हा दाखल झालो होता. यामध्ये अनिक्षाने अमृता फडणवीस यांना काही कथीत ऑडिओ क्लीप सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Marathi News Live Updates : पुण्यात उंड्री मुख्य मार्गावर सांडपाणी वाहिनीच्या चेंबरचे झाकण तुटल्याने अपघाताचे सत्र सुरुच

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT