मुंबई

राज्यात आरटीओ विभागाची ई-चलान प्रणाली ठप्प! तत्कालीन परिवहन आयुक्तांच्या आदेशाला हरताळ

प्रशांत कांबळे

मुंबई : राष्ट्रीय सूचना केंद्र यांनी विकसित केलेली ई चलान प्रणाली परिवहन विभागाच्या सर्व आरटीओ कार्यालयामध्ये सुरु करण्याचे तत्कालीन परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिले होते. त्यासाठी हॅन्डहेल्ड टर्मिनल्स (पीओएस मशीन) एसबीआयच्या मार्फत घेण्यास राज्य शासनाने मान्यता सुद्धा दिली. मात्र, गेल्या वर्षांपासून अद्याप या पीओएस मशिनद्वारे ई चलान घेतल्या जात नसल्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.

आरटीओतील वायुवेग पथकांच्या संख्येनुसार प्रत्येकी दोन पीओएस मशीन देण्यात आली आहे. तर आरटीओ कार्यालयानंतर्गत असलेल्या सीमा तपासणी नाक्यावर सुद्धा या मशीन वितरित करण्यात आल्या असून, त्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे. मात्र, अद्यापही राज्यात या मशीनचा वापरच होत नसल्याचे उघड झाले आहे. एकीकडे परिवहन विभागाकडून आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी करण्याचा परिवहन आयुक्तांकडून प्रयत्न केला जात असताना, दुसरीकडे मात्र, राज्यभरातील अधिकारीच परिवहन आयुक्तांच्या आदेशाला हरताळ फासत असल्याचे दिसते आहे.

अशी करता येणार कारवाई
मोटार वाहन कायद्यांतर्गत रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करतांना आता, कागदपत्रांऐवजी, ई-चलान मशिनचा वापर करता येणार आहे. वाहन चालकाने केलेल्या गुन्हाची नोंद आणि दंड देतांना, गाडी नंबर ई-चलान मशिनमध्ये टाकल्यास एका क्लिकवरच कारवाई करता येणार आहे. यामध्ये नगद पैसे स्विकारण्याचा पर्याय नसल्याने, कारवाईमध्ये पारदर्शकता येऊन परिवहन विभागाचा महसुल वाढविण्यात मदत होणार होती. 

आरटीओ अधिकाऱ्यांची वेळेची बचत
यापुर्वी भरारी पथकाने कारवाई केल्यानंतर दंडाची रक्कम सांभाऴून ठेवत दुसऱ्या दिवशी बँकेत भरण्यात येत होती. मात्र आता, ई-चलान मशिनमूळे कॅशलेस कारवाई होणार असल्याने, पैसे बँकेची झंझट दूर होऊन दंडाच्या रक्कमेतील अफरातफरीच्या घटना टळणार होत्या. मात्र, ई चलान देण्यासाठी पीओएस मशीनचा वापर होत नसल्याने प्रचलित पद्धतीनेच मानवीय हस्तक्षेपातून दंडात्मक कारवाई सुरू असल्याचे दिसते आहे.

मशीन वापरल्यास कामाचे होणार मुल्यमापण
केंद्र सरकारच्या ई-चलान वेब साईटवर मशिन घेण्यापुर्वी लाॅगीन करावे लागणार आहे. त्यानंतरच संबंधीत मशिन त्या अधिकाऱ्यांच्या नावावर दिल्या जाणार आहे. त्यासोबतच किती चलान दिल्या, किती महसुल गोळा झाला, एकूण किती वेळ काम करण्यात आले अशी संपुर्ण माहिती याद्वारे कळणार आहे. 

चलानचा दंड भरण्यासाठी तिन पर्याय

  • - क्रेडीट कार्ड किंवा डेबीट कार्डने दंड भरता येणार
  • - ई- चलान वेबवर जाऊन ही दंड भरता येणार
  • - काही गुन्ह्यांमध्ये तडजोड शुल्क मशिनने आकारता येत नसल्याने, असे प्रकरण न्यायालयाकडे पाठवता येणार

राज्यातील सर्व आरटीओ अधिकाऱ्यांना पीओएस मशिनच्या माध्यमातूनच ई चलान ने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, या आदेशाचे कोणी उल्लंघन करत असल्यास त्यांच्यावर आदेशाच्या भंगाची कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात परिवहन आयुक्तांनी सुद्धा अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना दिल्या आहे.
- पुरुषोत्तम निकम,
उपायुक्त, परिवहन विभाग

------------------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

Breakign marathi news RTO departments e-challan system stalled in the state mumbai latest live updates

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT